भाजपसोबत कटू अनुभव आला, म्हणून संसार मोडला, काँग्रेससोबत महापालिका ताकतीने लढवणार: महादेव जानकर
महादेव जानकर: काँग्रेससोबत आमची आघाडी झालेली आहे. आम्ही 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकीला सामोरे जात आहोत. जागावाटपाबद्दल अंतिम चर्चा सुरु आहे सगळीकडे आमचे उमेदवार अर्ज भरत आहेत, अंतिम चर्चेनुसार कुठले उमेदवार फायनल करायचे हे ठरवू असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जाण यांनी व्यक्त केले. आम्ही सगळीकडे ताकद लावत आहोत. मुंबईत आम्ही 25 ते 30 जागा लढवण्याच्या विचारात आहोत पण आम्हाला किती दिल्या जातात ते पाहू असे जानकर म्हणाले. भाजपसोबत आम्हाला कटू अनुभव आलेला आहे म्हणून तो संसार आम्ही मोडल्याचे जानकर म्हणाले.
काँगेसने सन्मानजनक वागणूक दिली तर आम्ही काँग्रेसोबत राहू नाहीतर आमचा स्वतंत्र पक्ष आहेच
लोकसभेला भाजप आणि महायुतीच्यासोबत होत. विधानसभा आम्ही स्वतंत्र लढल्या आणि आता महानगरपालिकांसाठी काँग्रेसच्या सोबत आहोत असे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
काँगेसने सन्मानजनक वागणूक दिली तर आम्ही काँग्रेसोबत राहू नाहीतर आमचा स्वतंत्र पक्ष आहे असे मत जानकर यांनी व्यक्त केले. आमचा पक्ष भाजप किंवा काँग्रेसने काढला नाही आम्ही स्वतः काढला आहे. आमच्या पक्षाची संघटना वाढवण्याचे अधिकार आम्हाला आहेत असे जानकर म्हणाले. 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये आम्ही ताकदीने सामोरे जातोय, आता आम्हाला यश येईल अशी आशा असल्याचे मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि एकेकाळी भाजपच्या सोबत असणाऱ्या महादेव जानकर यांनी काँग्रेससोबत नवी मोट बांधली आहे. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका रासप काँग्रेससोबत लढणार असल्याची घोषणा जानकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली होती. काही दिवसांपूर्वीच महादेव जानकर हे ठाकरेंनी मराठी निमित्ताने आयोजित केलेल्या जल्लोष मेळाव्यात दिसून आले होते. त्यानंतर जानकर महाविकास आघाडीसोबत येतील, असे बोलले जात होते. मात्र, त्यांनी काँग्रेससोबत युती केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे महादेव जानकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत या आघाडीची घोषणा केली होती. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे यावेळी जाहीर केले. यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे’.
महत्वाच्या बातम्या:
मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
आणखी वाचा
Comments are closed.