तळेगावात युती; लोणावळ्यात कुस्ती, आमदार भाचे अन् मामा-मावशी एकमेकांना घेरण्यासाठी मैदानात, एकमे
पुणे: पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे युती करणाऱ्या भाजप-राष्ट्रवादीनं लोणावळ्यात मात्र कुस्ती सुरु केली आहे. अजित पवारांचे आमदार सुनील शेळके (Sunile Shelke) आणि त्यांचे भाजपमधील मामा बाळा भेगडे अन् मावशी सुरेखा जाधव हे एकमेकांना घेरायला लागलेत. आमदारांनी लोणावळ्यात काय कामं केली? या प्रश्नाला उत्तर देताना, सुनील शेळकेंनी ये मावशे हे बघ मी कोट्यवधींचा निधी आणलाय. तर तळेगाव दाभाडेत युती करणाऱ्या मामा बाळा भेगडेंनी (Bala Bhegde) आता नेहमीप्रमाणे पलटी मारली, अशी खोचक टीका भाच्याने केली. मग माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधवांनी भाचे आमदारांचा एकेरी उल्लेख करत पलटवार केला.(Sunile Shelke)
ते एका जागेसाठी माझ्याशी भांडत आहेत, मी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा सोडून भाजपाचा का करत आहे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या अकरा जागा करा, सुनीलचा ऐकायचा विषय संपला. इतकी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली, त्यानंतर संध्याकाळी जे कोणी बगल बच्चे आहेत त्यांनी मला माहिती नाही. मला त्यांचं नावही घ्यायचं नाही, त्यांना येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली त्यांचं काय झालं मला माहिती नाही, काय चर्चा झाल्या, आणि दुसऱ्या दिवशी पलटूराम मामाने पलटी मारली. लोणावळ्यामध्ये मावशी म्हणाली मी काय-काय कामे केली आहेत, त्याचं मावशीला मी सांगतो, लोणावळा शहरात उपजिल्हा रुग्णालय उभा करण्याकरता 56 कोटी 84 लाख रुपये आणले, हॉस्पिटल उभं केलं मावशी बरोबर एक कट पुतळ्या आहे तो विचारतो मी काय काम केलं तर मी त्याला सांगतो, टायगर व लायन पॉईंटकडे जाणारा रस्ता करण्यासाठी 184 कोटी आणले, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
तर सुनील शेळकेंना उत्तर देताना भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी म्हटलं की, काल एक तळेगावचा माझा भाचा मला त्यांनी मावशी म्हटलं सगळ्यांना माहिती आहे की नाही, आता मी त्याला सुन्याच म्हणणार, कारण मी त्याचे मावशी आहे, काल जे त्यांनी इथे येऊन भाषण केलं ते लोणावळाकरांना भावलं का ते? लोणावळाकरांचा विश्वास आता पूर्णपणे उडालेला आहे, कारण कोणी येते, महिलेला कोणीही काहीही बोलतं, आम्हीही राजकारण केलं पण कोणाच्या कामावर, व्यवसायावर गेलो नाही, कालचं जे भाषण होतं ते विकासावर नव्हतं, जे विचारलं तर दे रे चिठ्ठी दे रे तो कागद, जो करतो त्याचं तोंडपाठ असतं, असा टोला सुनील शेळकेंना भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी लगावला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.