Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली

Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घडलेल्या दोन घटनांनी आज महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. एक घटना होती सभागृहाबाहेरची आणि दुसरी होती सभागृहाच्या कामकाजातली. एका घटनेत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आले आणि त्यांनी एकमेकांना शेकहँड करत हसतखेळत हा प्रसंग हाताळला. तर दुसरीकडं एकमेकांचे राजकीय मित्र असणारे दोन आमदार एकमेकांवर तुटून पडले. नेमकं काय घडलं, बघूया या स्पेशल रिपोर्टमधून.
राजकारणात कुणीही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, असं म्हणतात.त्यामुळं राजकीय विरोधक कधी मित्रासारखा वागेल आणि मित्र कधी प्रतिस्पर्ध्याप्रमाणे तुटून पडेल, सांगता येत नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या एकाच दिवसात या दोन्ही गोष्टी घडल्या.कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भेटले आणि राजकीय मित्र एकमेकांना भिडले.झालं असं की विधिमंडळ परिसरात असलेल्या मीडिया स्टँडवर आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधत होते.त्यांचं बोलणं संपायच्या आत तिथं नितेश राणे पोहोचले.पण आदित्य ठाकरे बोलत असल्यामुळं त्यांना थोडा वेळ वाट बघावी लागली. पुढे आदित्य ठाकरे बोलतायत आणि मागे नितेश राणे वाटत बघत उभे आहेत, हे चित्र माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालं. त्यामुळं आदित्य ठाकरेंचं बोलणं संपल्यानंतर हे दोघं आमनेसामने येणार, हे प्रत्येकाला समजलं आणि माध्यमांचे कॅमेरे हा क्षण टिपण्यासाठी सज्ज झाले.

Comments are closed.