Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटेंच्या अटकेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना फक्त दोन वर्षांची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पण नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालाला ही स्थगिती नाही, त्यामुळे त्यांच्या आमदारकीला धोका कायम असल्याचं सांगण्यात येतंय.
राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. सत्र न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगितीची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावणी आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात माणिकराव कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्या. आर एन लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे यांनी मंत्रदिपदाचा राजीनामा दिला आहे. असं असलं तरी अद्याप त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. एकीकडे त्यांना अटकेची भीती असताना दुसरीकडे त्यांची आमदारकी देखील धोक्यात आहे.
Comments are closed.