Anjali Damania Full PC : धनंजय मुंडेंना उचलून फेकून द्या, अंजली दमानियांच्या अश्रूंचा बांध फुटला
Anjali Damania Full PC : धनंजय मुंडेंना उचलून फेकून द्या, अंजली दमानियांच्या अश्रूंचा बांध फुटला
बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. संतोष देशमुख या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी धनंजय मुंडेंना (Dhanajay Munde) राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. हे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनी संताप व्यक्त केला आहे. तर या प्रकरणात अगदी सुरवातीपासून स्पष्टपणे आपली भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आज अश्रू अनावर झाले, त्यांनी सरकारला जाब विचारत असे लोक सत्तेत कशासाठी हवे आहेत, धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे, सरकार इतकं का त्यांना महत्व देतंय असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करत दमानियांनी धनंजय मुंडेंना खुलं आव्हान दिलं आहे.
धनंजय मुंडेंना दमानियांचं आव्हान
काल ते धनंजय मुंडे म्हणत आहेत माझ्याविरुद्ध जे जे बोलले त्यांना मी धडा शिकवीन, मी त्यांना ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा आहे तो शिकवा तुम्हाला जे करायचं आहे ते करा असेल हिम्मत तर बघू आपण. लढाईची ताकद ठेवते मी असेही पुढे अंजली दमानिया यांनी म्हटल आहे
Comments are closed.