Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर..
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…
केरळमध्ये मान्सून (Monsoon Alert) दाखल झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. पुढील 48 तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या मान्सूनबाबात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून सक्रिय झाला असून आता तो महाराष्ट्राकडे वेगाने सरकत आहे.
7 ते 14 जून दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळ पडणार नसून, पिकांना आवश्यक तेवढा सरासरी पाऊस पडेल आणि खरीप हंगाम चांगला राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
देशातील वाढत्या महागाईचा मोठा फटका आता थेट सलून व्यवसायालाही बसला आहे. वाढते इंधनाचे दर, महाग झालेली आंतरराष्ट्रीय व स्थानिक सौंदर्यप्रसाधने आणि वाढलेला दैनंदिन व्यवसाय खर्च यामुळे ‘महाराष्ट्र नाभिक महामंडळाने’ सलून सेवांच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नाभिक महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार, ही नवीन दरवाढ 6 जूनपासून संपूर्ण राज्यभरात अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे. वाढत्या महागाईत आपला व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हा दरवाढ करण्याचा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक होतं, असं स्पष्टीकरण नाभिक महामंडळाकडून देण्यात आलं आहे.
Comments are closed.