महायुतीचं मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर; कोणाला कोणती खाती?, संपूर्ण यादी एका क्लिकवर

महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री पदांची यादी: राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल (21 डिसेंबर)ला जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे.

कोणाला कोणते खाते मिळाले, संपूर्ण यादी-

कॅबिनेटमंत्री-

देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
– अजित पवार – अर्थ, राज्य उत्पादन
– चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
– राधाकृष्ण विखे- पाटील – जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
– हसन मुश्रीफ – मेडिकल एज्युकेशन
– चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
– गिरीश महाजन – जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
– गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा आणि स्वच्छता
– गणेश नाईक – वनमंत्री
– दादाजी भुसे – शालेय शिक्षण
– संजय राठोड – जलसंधारण
– धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा
– मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास
– उदय सामंत – उद्योग आणि मराठी भाषा
– जयकुमार रावल – मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
– पंकजा मुंडे – पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
– अतुल सावे – ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
– अशोक उईके – आदिवासी विकास
– शंभुराज देसाई – पर्यटन, खनिकर्म
– अॅड.आशिष शेलार – सांस्कृतिक कार्य आणि आयटी
– दत्तात्रय भरणे – क्रिडा आणि अल्पसंख्याक विकास
– आदिती तटकरे – महिला व बालविकास
– शिवेंद्रसिंह भोसले – सार्वजनिक बांधकाम
– अॅड.माणिकराव कोकाटे – कृषी
– जयकुमार गोरे – ग्रामविकास
– नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
– संजय सावकारे – टेक्सटाईल
– संजय शिरसाट – सामाजिक न्याय
– प्रताप सरनाईक – परिवहन
– भरतशेठ गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकास
– मकरंद जाधव पाटील – मदत आणि पुनर्वसन
– नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
– आकाश फुंडकर – कामगार
– बाबासाहेब पाटील – सहकार
– प्रकाश आबीटकर – आरोग्यमंत्री

राज्यमंत्री-

– माधुरी मिसाळ – नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, मेडिकल एज्युकेशन, अल्पसंख्याक विकास
– आशिष जयस्वाल – अर्थ, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्यायालये, कामगार
– पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म
– मेघना बोर्डीकर – साकोरे – आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास
– इंद्रनील नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण
– योगेश कदम – गृह (शहरी), महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन



भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी

अधिक पाहा..

Comments are closed.