महाराष्ट्र एफडीएकडून अॅसिलॉक कॅप्सूल विक्रीचा परवाना रद्द
महाराष्ट्र एफडीएने मे. कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीवर कारवाई केली आहे. कंपनीच्या पुणे, नागपूर आणि ठाणे येथील सीएफए (CFA) गोदामांचे विक्री आणि वितरण परवाने रद्द करण्यात आले आहेत. कंपनीने समान ब्रँड नावांनी औषधांची विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली. या औषधांवर फसवणूक करून ‘अॅसिलॉक’ (रॅनिटिडिन) आणि ‘अॅसिलॉक+’ (फॅमोटिडिन) असे लेबल लावण्यात आले होते. यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि वितरकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
पुण्यातील एका घाऊक विक्रेत्याने अॅसिलॉक 150/300 (रॅनिटिडिन) ची ऑर्डर दिली होती, मात्र प्रत्यक्षात त्यांना अॅसिलॉक+ 150/300 (फॅमोटिडिन) पुरवण्यात आले. नियमांनुसार आवश्यक पॅकचा आकार 14 गोळ्यांचा होता, परंतु अॅसिलॉक+ हे परवानगीशिवाय 30 आणि 20 गोळ्यांच्या पॅक आकारात वितरित केले जात असल्याचे तपासणीत आढळून आले.
Comments are closed.