शिवराज राक्षेची पंचांना मारहाण,पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; अजितदादा म्हणाले…
Maharashtra Kesari 2025 Ajit Pawar On Pruthviraj Mohol: पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) यंदाचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) किताबाचा मानकरी ठरला. अहिल्यानगरच्या बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. किताबासाठीच्या लढतीत मॅट विभागाचा विजेता मोहोळसमोर सोलापूरचा पैलवान आणि माती विभागाचा विजेता महेंद्र गायकवाडचं (Mahendra Gaikwad) आव्हान होतं. या चुरशीच्या लढतीत शेवटच्या क्षणी पृथ्वीराज मोहोळनं बाजी मारली. विजेत्या मोहोळला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरताच त्याच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचं गालबोट लागलं. मॅट विभागाचा उपांत्य फेरीचा सामना नांदेडचा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडली. पण या लढतीच्या निकालावरुन जोरदार राडा झाला. पंचांनी शिवराज राक्षे चितपट झाल्याचा निर्णय दिला. पण हा निकाल मान्य नसल्याचं म्हणत राक्षेनं पंचांशी हुज्जत घातली. मात्र यादरम्यान त्याचा तोल सुटला आणि त्यानं थेट पंचांवर लाथ उगारली. यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय कुस्तीगीर संघटनेने घेतला.
पृथ्वीराज मोहोळच्या विजयानंतर अजित पवार काय म्हणाले? (Ajit Pawar On Pruthviraj Mohol)
पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत अभिनंदन केले आहे. अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या ‘महाराष्ट्र केसरी 2025’ स्पर्धेच्या अंतिम सामन्याप्रसंगी उपस्थित राहिलो. या स्पर्धेत पुण्याचा सुपुत्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळ यानं महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला, मानाची गदा जिंकली. या उत्तुंग यशाबद्दल मी पृथ्वीराजचं मनापासून अभिनंदन करतो, त्याला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. यासारख्या रोमांचक खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीचं जतन केलं जातंय, याचं समाधान वाटतं. त्याचप्रमाणे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देखील मिळते. संपूर्ण महाराष्ट्राला पृथ्वीराजचा सार्थ अभिमान आहे, असं अजित पवार म्हणाले.
अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५’ स्पर्धेच्या अंतिम सामन्याप्रसंगी उपस्थित राहिलो. या स्पर्धेत पुण्याचा सुपुत्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळ यानं महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला, मानाची गदा जिंकली. या उत्तुंग यशाबद्दल मी पृथ्वीराजचं मनापासून अभिनंदन करतो, त्याला… pic.twitter.com/itfrguxx0x
– अजित पवार (@ajitpawarspeaks) 2 फेब्रुवारी, 2025
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित
महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्ती रंगली असताना असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे याला चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ आता सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. खरं तर कुस्ती हा शिस्तप्रिय खेळ आहे. मात्र खेळाडूवृत्ती न जपता गायकवाड आणि राक्षे यांनी बेशिस्तपणा दाखवल्याने कुस्तीगीर संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=oiqnq_p4gkg
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.