विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बंडखोरी, पुण्यात शिंदे गटाची माघार; नागपूरमध्ये भाजपात बंडाळी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे वगळता इतरत्र बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिल्याने महायुतीसमोर बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना बंडखोरांशी सामना करावा लागणार असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत रंगतदार लढती होण्याचा अंदाज आहे.

विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. या मुदतीत पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या बंडखोरांनी माघार घेतली

पुणे पदवीधरमधून अजित पवार गटाच्या प्रताप ऊर्फ भैय्या माने, तर शिक्षक मतदारसंघातून शिंदे गटाच्या मंगेश चिवटे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवार अनुक्रमे डॉ. स्मिता जाधव आणि काwस्तुभ गावडे यांना दिलासा मिळाला आहे. पुणे शिक्षकमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी निकम यांनी अर्ज मागे घेतला आहे; मात्र पुणे शिक्षकमधून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी राहिलेले सचिन सानप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

नागपुरात भाजपमध्ये राजीनामासत्र

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या सुधाकर कोहळे यांच्या विरोधात माजी आमदार अनिल सोले यांनी दंड थोपटले आहेत. सोले यांना उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये अंतर्गत दुफळी माजली असून माजी आमदार गिरीश व्यास यांनीही भाजपच्या सर्व पदांचे राजीनामे देत सोले यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांना राष्ट्रवादीच्या नीलेश कराळे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे.

अमरावती शिक्षकमध्ये शिंदे गटात बंडखोरी

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांना शिंदे गटाच्याच श्रीकांत देशपांडे यांनी बंडखोरी करत आव्हान दिले आहे. शिवसेनेचे दत्तात्रय लहाने येथून निवडणूक रिंगणात आहेत तर काँग्रेसने अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे.

Comments are closed.