Maharashtra Live Blog Updates: प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची अंतरवलीमध्ये जाऊन भेट घेणार
Maharashtra Live Blog Updates: भाजप नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची अंतरवलीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणबाबत चर्चा करण्यासाठी आंतरवलीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. मनोज जरांगेंची ही विनंती मान्य करत प्रसाद लाड हे आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत.. जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या आहेत. 23 मे च्या आत सरकारने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी चर्चेला यावं, अन्यथा 30 मे पासून अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता.. त्यामुळे आजच्या प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंच्या भेटीदरम्यान काय चर्चा होते याकडे लक्ष लागलंय.
Comments are closed.