Maharashtra Live Breaking Newsउद्धव ठाकरे यांचा आजपासून फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा
Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे यांचा आजपासून फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा असणार आहे. उद्धव ठाकरेंचा आज वाशिम, यवतमाळ, हिंगोली या तीन जिल्ह्यात कार्यकर्ता मेळावा होणार असून ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. ऑपरेशन टायगरनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन दौरा करत आहेत. पहिली सभा सकाळी साडेदहा यवतमाळमध्ये होईल. हा मतदारसंघ बंडखोर खासदार संजय देशमुख यांचा आहे. यानंतर दुपारी दोन वाजता वाशिममध्ये कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर सभा होणार आहे. वाशिम जिल्ह्यातही संजय देशमुख यांचा प्रभाव असल्याने या सभेकडे विशेष लक्ष लागलं आहे.तर दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे हिंगोलीत पोहोचतील. हिंगोली हा बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या सभेत ठाकरे आष्टीकरांच्या बंडखोरीवर थेट भाष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.