'UCC' लवकरच पश्चिम बंगालमध्ये येत आहे
समान नागरी संहिता विधेयक विधानसभेत येणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये लवकरच समान नागरी संहिता लागू केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. सध्या पश्चिम बंगाल विधानसभेचे अधिवेशन होत असून, याच अधिवेशनात हे या संहितेसंबंधीचे विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
सत्ता आल्यास राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यात येईल, असे आश्वानस भारतीय जनता पक्षाने त्याच्या विधानसभा निवडणूक वचनपत्रात दिले आहे. त्यानुसार हे विधेयक सादर केले जाणार आहे. हे विधेयक विधानसभेत संमत होणार, हे निश्चित आहे. कारण, भारतीय जनता पक्षाला विधानसभेत दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत आहे. ही संहिता लागू करणारे पश्चिम बंगाल हे भारतीय जनता पक्षाचे प्रशासन असणारे तिसरे राज्य ठरेल, असेही स्पष्ट केले गेले.
पुढच्याच आठवड्यात…
विधानसभेत हे विधेयक पुढच्याच आठवड्यात सादर करण्याची राज्य सरकारची योजना आहे. उत्तराखंड राज्याने ही संहिता लागू केली आहे. तसेच गुजरात आणि आसाममध्येही ती लागू करण्याच्या दृष्ठीने हालचाली केल्या जात आहेत. गोवा राज्यात पूर्वीपासूनच समान नागरी संहिता लागू आहे. पश्चिम बंगाल सरकारने हे विधेयक याच अधिकवेशात संमत केल्यास ते तिसरे राज्य ठरण्याची शक्यता आहे.
समान नागरी संहिता काय आहे.
भारतात वेगवेगळ्या धर्मांसाठी भिन्न भिन्न नागरी कायदे आहेत. त्यामुळे भिन्न भिन्न धर्मांच्या नागरीकांना त्यांच्या धर्मांच्या अनुसार भिन्न भिन्न नागरी न्याय मिळतो. विशेषत: महिलांसंबंधीच्या कायद्यांमध्ये बरीच भिन्नता आढळते. त्यामुळे भिन्न धर्मांच्या महिलांना समान परिस्थितीत भिन्न न्याय दिला जातो. कित्येकदा धर्माच्या कायद्यांच्या निमित्ताने महिलांवर अन्याय होतो. अशा परिस्थितीत सर्व नागरीकांना समान न्याय देण्यासाठी समान नागरी संहिता असणे आवश्यक असते. याच विचाराने भारतातील काही राज्यांनी समान नागरी संहिता लागू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. समान नागरी संहिता विशेषत: विवाह, घटस्फोट, वारसा अधिकार, वारसा अधिकारांची कायदा प्रक्रिया आणि दत्तक विधान यांच्यासाठीची असते. या सर्व संदर्भांमध्ये सर्व नागरीकांचे अधिकार त्यांचा धर्म कोणताही असला, तरी समान असावेत, ही समान नागरी संहितेची संकल्पना आहे.
समान नागरी संहितेत काय असणार…
लग्न
ड सर्व धर्मियांसाठी विवाहाच्या वयासंबंधीचे नियम समान असणार
ड सर्व विवाहांची नोंदणी, कायदेशीरत्व, कागदपत्र अनिवार्य होणार
ड कोणालाही एक विवाह झाला असताना दुसरा करता येणार नाही
घटस्फोट
ड विवाहितांना घटस्फोट घ्यायचा असेल, तर त्यासाठीचे नियम सर्वधर्मियांसाठी समानच असणार. या नियमांमध्ये धर्म पाहून परिवर्तन केले जाणार नाही
वारसा हक्क
ड सर्व धर्मांच्या महिलांना वडिलोपार्जित संपत्तीवर पुरुषांइतकाच अधिकार
लिव्ह इन रिलेशनशिप
ड सर्व लिव्ह इन रिलेशनशिप्सची आणि ती मोडल्याची नोंद अनिवार्य ठरणार
ड लिव्ह इन रिलेशनशिप्सची कागदपत्रे, कायदेशीर उत्तरदायित्व निर्धारित होणार
Comments are closed.