16 ऑगस्टपासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची, ओला, उबेरलाही बंधनकारक; कायद्यात सुधारणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमात सुधारणा करण्यात आली असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. व्यावसायिक प्रवासी वाहनांसाठी ही सक्ती असल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांसह ओला, उबर चालकांनाही मराठी भाषा येणे अनिवार्य असणार आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्टपासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

रोजगाराच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱया प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकीदेखील आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी मराठी भाषा प्रशिक्षण मोहीम राबविली आहे, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.