MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
देशभरात ‘नीट’ पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपर फुटल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र, एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने स्वतः ई-मेल पाठवून कोणतीही तक्रार नसल्याचं कळवलं आहे. तसेच या प्रकरणात आता रीतसर पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार असून एमपीएससीकडून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती महेंद्र हरपाळकर यांनी दिली. आयोगाने तक्रारदाराकडे पुरावे मागितल्यानंतर काही डिजिटल पुरावे सादर करण्यात आले होते. त्यानुसार 27 जुलै रोजी तक्रारदार आणि ज्या उमेदवाराला गैरप्रकाराचा लाभ मिळाल्याचा आरोप होता, अशा दोघांनाही आयोगाने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, दोघेही अनुपस्थित राहिले. दरम्यान, तक्रारदाराच्या मित्राने, ऋषिकेश गांगर्डे याने संभ्रम पसरवण्यासाठी ही तक्रार केल्याचा दावा करणारा आणखी एक ई-मेल आयोगाला मिळाला. त्यामध्ये एका तक्रारदाराने आता कोणतीही तक्रार नसल्याचे सांगत माघार घेतली आहे.
Comments are closed.