सहावीसाठी नवा अभ्यासक्रम, सुकाणू समितीची मंजुरी

इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखडय़ाला राज्यस्तरीय सुकाणू समितीने मंजुरी दिली असून जून महिन्यापासून हा नवा आराखडा लागू करण्यात येणार आहे. याआधी दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पाठय़पुस्तके तयार करण्याची जबाबदारी बालभारतीकडे सोपवण्यात आली आहे. ही पुस्तके येत्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय क्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला सुकाणू समितीकडून मंजुरी मिळाली आहे. अभ्यासक्रम समन्वय समितीकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाठय़पुस्तकांची निर्मिती करण्याचे काम सुरू होणार आहे.

SCERT द्वारे राज्यस्तरीय प्रशिक्षण

नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी एससीईआरटीतर्फे राज्यस्तरीय आणि त्यानंतर जिल्हास्तरावर शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणे सुलभ होणार आहे.

Comments are closed.