रोहित फॉर्मात राहिला तर अनेकांची प्ले ऑफची स्वप्ने उद्ध्वस्त होतील, सुनील गावसकरांचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिटमॅनच्या जोरदार कमबॅकने मुंबई इंडियन्सचे चाहते खूश झाले आहेत. ‘रोहित शर्मा असाच खेळत राहिला, तर अनेक संघांच्या प्ले ऑफच्या आशा तुटतील,’ असा स्पष्ट इशारा सुनील गावसकर यांनी दिला.

मुंबई इंडियन्सने सोमवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 229 धावांचा डोंगरसदृश लक्ष्य 6 विकेट्स राखून सहजपणे पार पाडले. रोहितच्या या खेळीने नॉकआऊटच्या कठडय़ावर उभ्या असलेल्या मुंबईला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईचे प्ले ऑफ जरतरवर अवलंबून आहे, मात्र रोहितचा फॉर्म प्ले ऑफच्या रांगेत असलेल्या संघांची झोप उडवू शकतो. सोमवारच्या खेळीने अनेकांची ती उडालीसुद्धा आहे.

मुंबईचे कर्णधारपद गेल्यानंतर रोहितने आपले अधिक लक्ष फलंदाजीवर केंद्रित केले आहे. तो आता जास्त वेळ क्रीझवर राहून संघाला भक्कम सुरुवात देतो. 40-50 धावांची त्याची खेळी संघाचा पाया मजबूत करतेय. रोहितचा हा फॉर्म कायम राहिला तर मुंबई इंडियन्स उर्वरित सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठा धोका ठरणार आहे, हे भाकीतसुद्धा गावसकरांनी वर्तवलेय. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे अनेक संघांची प्ले ऑफची समीकरणे बिघडू शकतात. त्यामुळे रोहितच्या फॉर्मवर सर्वांच्या नजरा लागल्या असतील, असे गावसकर म्हणाले.

Comments are closed.