पदक जिंकूनही सात्त्विक-चिराग यांचा देशवासीयांवर संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देशासाठी घाम गाळा, पदक जिंका आणि परतल्यावर शांततेत घरी या. अशीच संतापजनक परिस्थिती हिंदुस्थानची बॅडमिंटनमधील स्टार दुहेरी जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या बाबतीत घडली. थॉमस कपमध्ये कांस्यपदक जिंकूनही या खेळाडूंना अपेक्षित सन्मान मिळाला नाही आणि अखेर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला.

कुणालाच काही पडलेलं नाही!

सात्त्विकने इन्स्टाग्रामवर संताप व्यक्त करत लिहिले की, ‘दोन आठवडे आम्ही देशाचं प्रतिनिधित्व करताना जिवाचं रान केलं, मात्र आम्ही काय मिळवलं याची कुणालाच कल्पना नाही. खरं सांगायचं तर कुणालाच त्याची पर्वा नाही.’ हीच भावना चिरागनेही शेअर केली. नाव न घेता त्यांनी व्यवस्थेवरच घणाघात केला. देशासाठी पदक जिंकूनही खेळाडूंना ‘उपकार’ केल्यासारखी वागणूक मिळत असेल तर हे चित्र लाजिरवाणे नाही का?

क्रिकेटला रेड कार्पेट, बाकी खेळांना ‘साईड सीट’

सात्त्विकच्या पोस्टवर चाहत्यांनीही संताप व्यक्त करत सोशल मीडियावर आवाज उठवला. ‘क्रिकेटपटूंसाठी जल्लोष, मिरवणुका आणि कोटय़वधींचा वर्षाव, पण बॅडमिंटनसारख्या खेळात पदक जिंकणाऱयांची साधी विचारपूसही नाही. हा दुजाभाव किती दिवस सहन करायचा? देशाचं नाव उज्ज्वल करणाऱया खेळाडूंना अशी उपेक्षा म्हणजे क्रीडा व्यवस्थेचा पराभवच,’ अशा शब्दांत नेटकऱयांनी शासनाच्या उदासीन क्रीडा धोरणाबद्दल सुनावले.

स्वयम वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने केशवराव दाते उद्यानात रविवार, 3 मे रोजी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभाप्रसंगी उपस्थित माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, उपशाखाप्रमुख अजय कौसाले, महाराष्ट्र वितरक सेनेचे सचिव संतोष देवरुखकर व ज्येष्ठ शिवसैनिक शरद पवार उपस्थित होते.

Comments are closed.