‘बंधू मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन, ठाकरे बंधू एकत्र येणार?; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठेवली नि
महाराष्ट्र राजकारण: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र यावं, अशी गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी लोकांची इच्छा आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशा आशयाचे बॅनर्स पुन्हा एका शिवसेना भवनासमोर काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, यासाठी हे बॅनर्स लावले होते. आता पुन्हा एकदा मोहनिश राऊळ यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मोहनिश राऊळ यांनी “बंधू मिलन” कार्यक्रमाचं आयोजन गुढीपाडव्याच्या दिवशी केला आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं, अशी विनंती निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केली जाणार आहे. दरम्यान, मोहनिश रविंद्र राऊळ यांनी ही निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ठेवली आहे.
निमंत्रण पत्रिकेत नेमकं काय म्हटलंय?
बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असे या निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणार का?
राज्यातील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचा सुपडा साफ झाल्यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची हवा पसरली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळवला. तर 128 जागा लढवणाऱ्या मनसेला एकाही जागेवर उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, त्यासाठी पुढाकार कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित होता. त्यानंतर आता बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाचं निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वीकारणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.