राज्यात तिसरीनंतरही हिंदीची सक्ती नाही; इयत्ता तिसरी ते दहावीचा सुधारीत अभ्यासक्रम जाहीर
महाराष्ट्र शिक्षण 2025 मुंबई: राज्यात तिसरीनंतरसुद्धा हिंदीची सक्ती करण्यात आलेली नाही. तिसरी ते दहावीचा सुधारीत अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या नव्या अभ्यासक्रमात त्रिभाषा सूत्राचा उल्लेख नाही. मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तर त्रिभाषा सूत्र समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
इयत्ता तिसरी ते दहावी शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा 2025 शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. या मसुद्यात इयत्ता तिसरीनंतरही दोनच भाषांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या शिक्षण अभ्यासक्रमाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राचा इयत्ता तिसरी नंतर सुद्धा अद्याप विचार करण्यात आलेला नाही. त्रिभाषा सूत्राचा विचार त्रिभाषा सूत्र समितीच्या अहवालानंतर कुठल्या वर्गापासून समावेश करायचा याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
20 विषयांमध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा समावेश-
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने हा प्रस्तावित मसुदा जाहीर केला असून 27 ऑगस्ट पर्यंत या संदर्भातील अभिप्राय करण्याचा आवाहन एससीईआरटीने केला आहे. इयत्ता तिसरी ते दहावीसाठी तयार करण्यात आलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रम आराखड्यात वीस विषयांचा समावेश करण्यात आला आहे. या 20 विषयांमध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा समावेश सध्या पाहायला मिळतंय.
परिसर अभ्यास या ऐवजी “सभोवतालचे जग” विषयाचा समावेश-
त्रिभाषा सूत्रसंबंधी निर्णय सध्या शिक्षण विभागाने मागे घेतल्यानंतर यावर समितीने अहवाल सादर केल्यानंतरच त्रिभाषा सूत्र कोणत्या वर्गापासून अवलंब करायचा याबाबतचा निर्णय घेतला जाईल. इयत्ता सहावी पासून व्यवसायिक शिक्षण या स्वतंत्र विषयाचा अभ्यासक्रमाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे तर इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी परिसर अभ्यास या ऐवजी “सभोवतालचे जग” या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
शिक्षण कर्जाची माहिती:
शिक्षण कर्जाची गणना करा ईएमआय
आणखी वाचा
Comments are closed.