महाराष्ट्राला उत्तर प्रदेशकडून पराभवाचा धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यजमान महाराष्ट्राला १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सोमवारी उत्तर प्रदेशकडून पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.

झारखंड आणि हरियाणाने आपापल्या गटातील दुसरा विजय नोंदवत पात्रतेच्या शर्यतीतील आपली स्थिती भक्कम केली. दरम्यान, हॉकी मध्य प्रदेशने पहिल्या सामन्यात विजय मिळवत शानदार पुनरागमन केले.

पिंपरीमधील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. गट ‘क’मध्ये उत्तर प्रदेशने यजमान महाराष्ट्रावर ३-० असा दणदणीत विजय नोंदवला. विभाग ‘अ’मध्ये गट ‘अ’च्या सामन्यात झारखंडने पंजाबचा ३-१ असा पराभव केला, तर गट ‘ब’मध्ये हरियाणाने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशावर ३-१ असा विजय मिळवत आपापल्या गटात आघाडी कायम राखली. गट ‘ड’मध्ये मध्य प्रदेशने पिछाडी वरून मुसंडी मारत छत्तीसगडचा ३-१ असा पराभव केला.

Comments are closed.