Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी देवगिरी बंगल्यावर पार पडलेली बैठक अत्यंत वादळी ठरली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘साईडलाईन’ झालेले सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोघेच या बैठकीत चर्चेचा विषय ठरले. या बैठकीला प्रफुल पटेल यांनी मुंबईत असूनही दांडी मारली. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या बैठकीसाठी आले पण त्यांनी यावेळी सुनावलेल्या कठोर शब्दांमुळे त्यांची आणि छगन भुजबळ यांची जुंपल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ दिले आणि राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्याने होतो. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी कालच्या बैठकीत आपल्या मनातील सगळी खदखद सुनेत्रा पवार यांच्यासमोर बोलून दाखवली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे, पक्ष एकसंध ठेवणे यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, त्यानंतर उदभवलेल्या स्थितीमधे आमच्या दोघांवर टीका सुरु असताना पक्षाचा एकही आमदार अथवा नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही. याशिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुनही मी आणि पटेल दोघेच टीकेच्या तोफेच्या तोंडी गेलो. त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही पुढे येऊन आमची बाजू मांडण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
Comments are closed.