मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार सुगंधी दूध
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील शासकीय वसतिगृहे आणि शासकीय निवासी शाळांमधील अनुसूचित जातीच्या तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता दररोज 200 मिली सुगंधी दूध टेट्रा पॅक मिळणार आहे. 15 सप्टेंबरपासून सुगंधी दूध योजना सुरू होणार आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची राज्यात 449 शासकीय वसतिगृहे असून, त्यांची एकूण प्रवेश क्षमता 46 हजार 663 विद्यार्थी इतकी आहे. याशिवाय अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला-मुलींसाठी 92 शासकीय निवासी शाळा सुरू असून, त्यांची प्रवेश क्षमता 18 हजार 600 विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांना सुगंधी दूध पुरवठय़ाचा कालावधी तीन वर्षांचा राहणार आहे.
Comments are closed.