वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा…; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस म

महाराष्ट्र वाहतूक पोलीस: वाहतूक पोलिसांच्या वर्तनावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी नाराजी नोंदवताच राज्याचे वाहतूक अप्पर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षक यांच्यासाठी परिपत्रक काढले आहे. यात सर्व वाहतूक पोलीस (Traffic Police) अधिकारी व कर्मचाऱ्यांना चालकांकडून प्रलंबित ई-चलान दंड वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करू नये, पैशांची अवैध मागणी करू नये आणि चालकांशी सौजन्याने वागावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. तसेच या सूचनांचे किंवा ई-चलान वसुलीबाबत जारी केलेल्या परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. (Maharashtra Traffic Police)

राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी 5 मार्च 2026 रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीत वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी वाहतूक पोलिसांच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रारी मांडल्या. त्यात वाहतूक पोलिस चालत्या वाहनांना अनावश्यक थांबवून ई-चलान (E-Challan) दंड जबरदस्तीने वसुली करतात. दंड न भरल्यास वाहन अडवणे, कागदपत्रे जप्त करण्याची धमकी देतात, चालकांशी उद्धट वर्तन करतात, चालत्या वाहनांना अनावश्यक थांबवून ई-चलान दंड जबरदस्तीने वसुली करतात, काही प्रकरणांमध्ये पैशांची अवैध मागणी केल्याचाही आरोप करण्यात आले. (Maharashtra Traffic Police)

ई-चलान दंड वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करू नये, वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश

सदर प्रकरणाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नाराजी नोंदवल्यानंतर राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी परिपत्रक काढून अशा प्रकारचे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असून वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना चालकांकडून प्रलंबित ई-चलान दंड वसुलीसाठी कोणतीही जबरदस्ती करू नये, पैशांची अवैध मागणी करू नये आणि चालकांशी सौजन्याने वागावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी घेतला मोठा निर्णय- (Mumbai Traffic Police)

मुंबई मेट्रो अक्वा लाईन 3 वरील स्थानका बाहेरील परिसर 30 मीटर परिसरात 24 तासासाठी आता नो पार्किंग झोन राहणार आहे. मुंबई मेट्रो अक्वा लाईन 3 कफपरेड ते आरे मेट्रोलाईन एकूण 33.5 किमी असून त्यावर मेट्रोची 27 स्थानके आहेत. या मेट्रो स्थानकांना विविध रस्त्यांवर प्रवेश आणि निकास देण्यात आले आहेत. मात्र अनेक प्रवेशद्वार व निकासद्वारावर वाहने उभी राहत असल्याने नागरिकांची गैरसोय होते. तसेच या प्रवेशद्वार किंवा निकासद्वारावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळं वाहतुकीसाठी अडथळा होत असल्याने वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाने मेट्रो स्थानकाबाहेर असलेल्या प्रवेश आणि निकासबाहेर 30 मीटर परिघात 24 तास नो पार्किंग झोनच्या घोषणा केली आहे. अप्पर पोलिस आयुक्त वाहतूक विभागाच्या डाॅक्टर प्रियांका नारनवरं यांनी आपल्या विशेष  अधिकाराचा वापर करून हे आदेश पारित केले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

आणखी वाचा

Comments are closed.