Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या

Uddhav Thackeray on मराठी| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
उद्धव ठाकरे, अंधेरी: “मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आम्ही औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है?” असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह परत उद्या येताय त्यांचा समाचार तर घेणार,मी सोडणार नाही.पाठीत वार केला की वाघ नखं आम्ही काढू..मिठी मारली तर प्रेमाने मारू दगाबाजी केली तर वाघनखं काढू…1978  साली पुलोदच्या दग्गाबाजीमध्ये भाजप सुद्धा होता… त्याला खतपाणी तुम्ही दिला त्यात चेंबूरचे हशू अडवणी सुद्धा होते. दग्गाबाजीचे बीज तुमच्यात आहेत अमित शाहजी..90 हजार RSS चे लोकं आता कामाला येणार आहे का? तो रक्तदान करेल कीं गोमूत्र दान करेल? असा सवालही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज उपनगरात आपण सभा घेतोय, अडचणीची जागा आहे. वांद्रेला गद्दारांचा मेळावा सुरु आहे, आपली सभा झाल्यानंतर ते चिरकतील. तुम्ही महाराष्ट्रच्या अस्मितेचा वध हे गद्दार करत आहेत. गद्दारांना जिंकवणारे अमित शाह आहेत. महापालिका होऊ द्या मग यांची काय विल्हेवाट होते बघा..आता बसायचा तर बसा नाही तर घरी निघून जा…रुसू बाई रुसू कोपऱ्यात जाऊन बसू..गावात जाऊन बसू डोळ्यातले अश्रू त्यांच्या डोळ्यात दिसताय. आपण गाफिल राहिलो त्याचा फायदा त्यांनी घेतला..

Comments are closed.