विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होणार आहे. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्या भाजप प्रवेशानंतर रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेची पोटनिवडणूकसुद्धा 12 मे रोजी पार पडणार आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता. प्रज्ञा सातव यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै 2030 पर्यंत होता. दरम्यान, 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीच्या जागेवर महायुतीचा विजय निश्चित आहे. दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळा सदस्यांचा कोटा असणार आहे. बहुमत असलेल्या भाजपकडेच पोटनिवडणुकीची जागा जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी 144 मतांचा कोटा निश्चित- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकीत 9 जागांसाठी स्वतंत्र मतदान, तर एका जागेसाठी स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 9 जागांसाठी जितेंद्र भोळे निवडणूक निर्णय अधिकारी तर प्रज्ञा सातव यांच्या जागी होणाऱ्या निवडणुकीसाठी विलास आठवले काम पाहणार आहेत. 9 जगांसाठी 29 मतांचा कोटा तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी 144 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. 4 तारखेला पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या उमेदवाराला मतदानाचा अधिकार मिळाल्यास 9 जागांसाठी मतांचा कोटा हा 29 तर प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी निवडून येण्यासाठी 145 मतांचा कोटा निश्चित होणार आहे.
10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी दोनवेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी एकदा मतदान होणार तर प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान होईल. दोन्ही मतदान जरी एका दिवशी होणार असलं, तरी आमदारांना दोन वेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी 29 चा कोटा असणार आहे. तर एका जागेसाठी 51 टक्के मतांची मर्यादा असणार आहे. या समीकरणामुळे 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार तर महाविकास आघाडीला 1 जागेवर समाधान मानावं आहे.
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
- उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
- नीलम गोऱ्हे (शिवसेना)
- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
- गोपीचंद पडळकर (भाजप)
- रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
- राजेश राठोड (काँग्रेस)
- प्रवीण दटके (भाजप)
- रमेश कराड (भाजप)
विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)
- प्रज्ञा सातव
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
- उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
- मतदानाची तारीख: 12 मे 2026
- मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
- मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.