हिवाळी अधिवेशनाचे काम करण्यास नागपुरातील कंत्राटदारांचा सफसेल नकार, हजारो कोटींची देयके थकलेलेच
महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन 2025: नागपुरात येत्या 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Legislative Assembly Winter Session 2025) सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने विधान भवनाहीसह नागपुरात मंत्र्यांचे निवास असलेल्या रविभवन आणि नागभवन तसेच आमदार निवासाच्या इमारतींमध्ये सुधारणा व डागडुजीचे तब्बल 94 कोटींचे काम प्रस्तावित केले आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या काळातील कामांचे गेल्या वर्षीचे 78 कोटींचे बिल अद्याप प्रलंबित असल्याचे कारण पुढे करत ‘नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन’ने यावर्षी काम करण्यास नकार दिला आहे. दिवाळीपर्यंत थकीत पैसे देऊ, असे आश्वासन सरकारने दिले होते.
मात्र, दिवाळी निघून गेल्यानंतर ही सरकारने मागील वर्षांची थकीत पैसे अजून दिलेले नाही. त्यामुळे यंदा नवे काम करण्यास आम्ही नकार दिल्याचं नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन म्हणणं आहे. कंत्राटदारांच्या या काम बंद आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. हिवाळी अधिवेशनसाठीचे आवश्यक काम डिसेंबर महिन्यापर्यंत कसे पूर्ण करावे, असे पेच सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निर्माण झाले आहे. दरम्यान याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी कॅमेरासमोर बोलायला तयार नाही.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.