विधीमंडळातील मंत्री, आमदारांकडूनच नियमांचे उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
नागपूर : विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांना शिस्त लावण्याची गरज आहे च्या? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण गेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) समर्थकांमध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी झाल्यानंतर विधीमंडळातील एकूणचं सुरक्षेवर बोट ठेवण्यात आले होते. या घटनेनंतर आमदार मंत्री यांच्यासोबत येणाऱ्या विनापास व्यक्तींना न सोडण्याचा निर्णयहे अध्यक्षांनी घेतला होता. मात्र, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session 2025) अध्यक्षांनी घातलेले हेf आणि नियम मंत्री आणि आमदारच पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे. विधीमंडळ सुरक्षा पोलिसांनी नियमांचे उल्लंघन सदस्यांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द केलाय.
नियमांचे उल्लंघन, सदस्यांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळातील 15 सदस्यांनी आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीला विनापास अधिवेशात प्रवेश दिलाहे. विनापास प्रवेश देणार 3 सदस्य हे विधान परिषदेतील सत्ताधारी आमदार होते. तर 12 सदस्य हे विधानसभेचे असून या मधे एक कॅबिनेट मंत्र्याचा देखील समावेश आहे. विधान परिषद सदस्य परिणय फुके, योगेश टिळेकर यांनी आपल्यासोबत पास नसलेल्या व्यक्तीना आत आणले आहे. तसा अहवाल विधीमंडळ सुरक्षा पोलिसांकडून अध्यक्ष आणि सभापतींना दिलाहे. तर सभापती राम शिंदेंनी हा अहवाल सभागृहात वाचून पहिल्याच दिवशी नाराजी नोंदवली आहे.
पहिल्याच दिवशी विधीमंडळातील 15 तर दुसऱ्या दिवशी 8 सदस्यांकडून सोबतच्यांना विनापास प्रवेश
मात्र, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही 8 सदस्यांनी आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीकडे पास नसताना त्यांना विधीमंडळात प्रवेश दिलाहे. यात आमदार राजू कोरमोरे सोबत 1 व्यक्ती, प्रकाश सुर्वेंसोबत 2 व्यक्ती, महेश शिंदे सोबत 1 व्यक्ती, प्रवीण तायडेसोबत 1 व्यक्ती, किशोर जोरगेवार यांच्यासोबत 1 व्यक्ती, सिद्धार्थ खरातसोबत 1 व्यक्ती आणि मंत्री अशोक उईकेसोबत 1 व्यक्तींनी विना पास विधीमंडळात प्रवेश केला. याबाबतचा गोपनिय अहवाल विधीमंडळ सुरक्षेच्या पोलिसांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. यावरून विधीमंडळातील सदस्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने घातलेल नियम हे सदस्य विशेषता मंत्रीच पायदळी तुडवत असल्याने या मंत्री व आमदारांना शिस्त लावणे गरजेची असल्याचे म्हटले जाते.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.