महायुती सरकारच्या कॅबिनेट खात्यांच्या कामाचं ऑडिट, शिंदे गटाचा हायक्लास परफॉर्मन्स
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या सरकारची सूत्रं हाती घेतल्यानंतर पहिल्या 100 दिवसांसाठीचा रोडमॅप जाहीर करण्यात आला होता. हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. महायुती सरकारला (Mahayuti Government) 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाताली सर्व खात्यांच्या 100 दिवसांतील कामगिरीचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती. कामगिरीच्या मूल्यमापनाची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेला शंभर दिवसांच्या आढाव्यात मंत्रालयातील आठ विभागांची कामगिरी अव्वल केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया या कंपनीकडून प्रत्येक विभागाचं लेखापरीक्षण अर्थात ऑडिट (Audit) करण्यात आले आहे. या ऑडिटनंतर एकूण 60 विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या आठ विभागांची निवड करण्यात आली आहे. आता या आठ विभागांमधून पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत. येत्या आठवडाभरात महायुती सरकारमधील सर्वात चांगली कामगिरी करणारे तीन विभाग कोणते असतील, याचा निकाल जाहीर केला जाईल. तर इतर विभागांना कलर कोड देऊन कामगिरी सुधारण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. या विभागांची ग्रीन झोन, यलो झोन आणि रेड झोन अशी विभागणी केली जाईल. चांगली कामगिरी असणारे विभाग ग्रीन झोनमध्ये, मध्यम कामगिरी असणारे विभाग यलो झोनमध्ये आणि खराब कामगिरी असणारे विभाग रेड झोनमध्ये अशाप्रकारे ही वर्गवारी असेल.
दरम्यान, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने चांगल्या कामगिरीमुळे निवड केलेल्या खात्यांच्या यादीवर नजर टाकल्यास त्यामध्ये शिंदे गटाचा (Shivsena Shinde Camp) वरचष्मा दिसून येतो. या आठ विभागांमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असणारे पाच विभाग, भाजपचे दोन आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केवळ एका विभागाचा समावेश आहे. त्यामुळे आता या तिघांपैकी कोणत्या पक्षाचा विभाग अव्वल ठरणार, हे बघावे लागेल.
कोणते आहेत मंत्रालयातील टॉप विभाग
1)सार्वजनिक बांधकाम विभाग- एकनाथ शिंदे
2)परिवहन विभाग- प्रताप सरनाईक
3)महिला व बालविकास विभाग- आदिती तटकरे
4)ग्रामविकास विभाग- जयकुमार गोरे
)) ऊर्जा विभाग- देवेंद्र फडणवीस
6) सार्वजनिक आरोग्य विभाग- प्रकाश आबिटकर
7) उद्योग विभाग- उदय समंत
8)गृहनिर्माण विभाग- एकनाथ शिंदे
https://www.youtube.com/watch?v=paw1kxaguzo
आणखी वाचा
तेव्हा मी पायलट होतो, फडणवीस आणि अजित दादा को-पायलट; आम्ही योजनांचं टेकऑफ केलं : एकनाथ शिंदे
अधिक पाहा..
Comments are closed.