शिवसेनेच्या आमदाराने एकनाथ शिंदेंच्या विरोधातच दंड थोपटलं; म्हणाले, जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठ

Mahesh Shinde On मराठी: साताऱ्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) हे मला पहिल्यापासून वेगळी वागणूक देतात. कोणत्याही कार्यक्रमांना मला बोलावलं जात नाही, असा आरोप महेश शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या सातारा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपणास कार्यक्रमासाठी बोलावलेच नाही, फोनही आलेला नाही, असा दावा महेश शिंदे यांनी केला आहे. तसेच हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाही की मी जाणार नाही. साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझे फोटो बॅनरवर नसतात, असे म्हणत महेश शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. तर जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे, असा सवाल करत स्थानिक नेतृत्वालाही महेश शिंदे यांनी टोला लगावला.

साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर- (Shivsena Satara Politics)

जिल्हा परिषद निवडणुकीवर बोलताना माझी पत्नी शिवसेनेतून निवडून आली आणि भाजपकडून अध्यक्ष झाली नाही. आम्ही पहिल्यापासून भाजपसोबत काम करत आलो आहोत, असे स्पष्ट करत महेश शिंदे यांनी आपली राजकीय भूमिका मांडली. याचबरोबर पाच वर्ष पालकमंत्रीपद असूनही 30 सदस्यांपर्यंत पोहोचता आलं नाही, असा घणाघात करत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर महेश शिंदेंनी टीका केली. महेश शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असून आता या टीकेला स्थानिक नेते काय उत्तर देणार? आणि पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत महेश शिंदे? (Who Is Mahesh Shinde)

  • महेश शिंदे हे शिवसेनेचे साताऱ्यातील कोरेगावचे आमदार
  • जि.प.निवडणुकीत पत्नी प्रिया महेश शिंदे भाजपकडून विजयी
  • शिवसेनेशी विरोध घेत महेश शिंदेंनी प्रिया शिंदेंना निवडून आणले
  • शिवसेनेचे दोन जि.प.सदस्यही महेश शिंदेंनी आपल्यासोबत नेले
  • शिवसेना-राष्ट्रवादीच्या 35 जागा असूनही शिंदेंमुळं 27 जागांच्या भाजपचा अध्यक्ष विजयी
  • जि.प.अध्यक्ष निवडीवेळी धक्काबुक्की झाल्याचा मंत्री शंभूराज देसाईंचा दावा
  • शंभूराज देसाईंच्या तक्रारीनंतर विधानपरिषदेत पो.अधीक्षक तुषार दोशींवर कारवाई
  • मुख्यमंत्र्यांनी तुशार दोशींचं निलंबन थांबवून सक्तीच्या रजेवर पाठवले
  • महेश शिंदेंची राष्ट्रवादीतून राजकीय कारकिर्द सुरु
  • शिंदे राष्ट्रवादीतून भाजपात, पण कोरेगाव शिवसेनेला गेल्यानं शिवसेनेत

संबंधित बातमी:

Mahesh Shinde: मला पहिल्यापासून वेगळी वागणूक, एकनाथ शिंदेंच्या सभेचं निमंत्रणही नाही…; शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनी सगळं सांगितलं, साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?

Satara : एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा

आणखी वाचा

Comments are closed.