मुंबई इंडियन्सची मॅच संपल्यावर हार्दिकच्या लेकाची आईसारखी काळजी घेताना दिसली महिका, VIDEO
हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्य पंड्यासोबत माहिका शर्मा: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) धडाकेबाज कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा (Mahika Sharma) यांचं लवीडवी कपल सध्या ‘टॉक ऑफ द टाऊन’ बनली आहे. हार्दिक पांड्या महिकाबाबत (Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma) जेवढा प्रोटेक्टिव्ह आहे, तेवढीच महिकासुद्धा हार्दिकसाठी केअरिंग दिसतेय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये महिका शर्मा हार्दिक पांड्या आणि त्याची एक्स वाईफ नताशाचा मुलगा अगस्त्य पांड्याची (Hardik Pandya Son Agastya Pandya) काळजी घेताना दिसतेय. अगस्त्याला पब्लिक आणि पॅपाराझींपासून प्रोटेक्ट करण्यासाठीची महिकाची धडपड कॅमेऱ्याद कैद झाली आहे.
हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा यांच्यातलं नातं आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. 2025 मध्ये आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केल्यापासून, हे जोडपं विविध प्रसंगी एकत्र दिसून आलंय. मग ती एखादं आउटिंग असो किंवा एखादा महत्त्वाचा सामना, महिका सातत्यानं हार्दिकसोबत सावलीसारखी वावरताना दिसते. मात्र, महिकाचं प्रेम आणि काळजी केवळ हार्दिकपुरतीच मर्यादित नाही, ती हार्दिक पांड्याचा मुलगा ‘अगस्त्य’ याच्यावरही तितकंच मनापासून प्रेम करते आणि एखाद्या आईच्या मायेनं त्याची काळजी घेते. आम्ही हे मनानं सांगत नाही, एका व्हायरल व्हिडीओत हे पाहायला मिळतंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी हीच भावना व्यक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये, महिका अत्यंत प्रेमानं अगस्त्यची काळजी घेताना दिसून आली.
अगस्त्याला पॅपाराझींच्या कॅमेऱ्यापासून प्रोटेक्ट करताना दिसली महिका (Mahieka Sharma Agastya Pandya Video)
इंडियन प्रीमियर लीग 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगलेला. इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सामना संपल्यानंतर महिका हार्दिकचा मुलगा अगस्त्य पांड्या याच्यासोबत वानखेडे स्टेडियममधून बाहेर पडताना दिसली. महिकाला पाहून पॅपाराझींचे कॅमेरे तिच्यावर आणि तिच्यासोबत असलेल्या अगस्त्यावर खिळले. पण, महिकानं पॅपाराझींसमोर पोज देण्याऐवजी, अगस्त्यचा विचार केला आणि लगेच सर्व पॅपाराझींना फोटो न काढण्याची विनंती केली. एवढंच नाहीतर महिकानं अगस्त्यचे डोळे आपल्या हातांनी झाकले आणि सर्वांच्या गर्दीतून वाट काढत त्याला गाडीच्या दिशेनं घेऊन गेली. अगस्त्यसाठी महिकाचं एवढं प्रोटेक्टिव असणं, नेटकऱ्यांना भावलं आणि तिच्या व्हायरल व्हिडीओवर सर्वांनी कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली.
हार्दिक पंड्यानं गर्लफ्रेंडला गिफ्ट केली लक्झरी कार
हार्दिक पांड्यानं नुकतीच महिका शर्माला एक आलिशान ‘मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास’ (Mercedes-Benz V-Class) भेट दिली. या गाडीची किंमत 1.7 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. या चकचकीत काळ्या रंगाच्या गाडीशेजारी उभं राहून पोज देतानाचे महिका आणि हार्दिकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, हार्दिकनं नुकतीच आपला मुलगा अगस्त्य यालाही एक लक्झरी कार भेट दिली होती आणि स्वतःसाठी एक ‘फेरारी’ (Ferrari) सुद्धा खरेदी केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.