महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर कोसळला,उच्चांकावरुन 400 रुपयांची घसरण,निफ्टी ऑटोवर सर्वाधिक फटका
मुंबई : भारतातील वाहन उद्योगातील प्रमुख कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 50 आणि निफ्टी ऑटोवर महिंद्रा कंपनीला फटका बसल्याचं दिसून आलं आहे. बाजार सुरु झाला तेव्हा निफ्टी 50 तेव्हा शेअरमध्ये 50 टक्के घसरण झाली. युरोपियन युनियन सोबत भारताचा मुक्त व्यापार करार होणार असल्यानं याचा परिणाम देखील महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरवर झाल्याचं पाहायला मिळालं. पावणे बारा वाजता महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 118.60 रुपयांच्या घसरणीसह 3424.80 रुपयांदरम्यान ट्रेड करत होता. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये गेल्या चार महिन्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे.
Mahindra and Mahindra : महिंद्रा अँड महिंद्राला सर्वाधिक फटका
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार झाल्यानंतर EU ला ऑटो आणि तंत्रज्ञान उत्पादन या सारख्या क्षेत्रात फायदा मिळू शकतो. इलेक्ट्रिक वाहनं, इंटर्नल कंबस्चन आणि इंजस आणि अवजड वाहनं याचा स्वतंत्र कोटा निश्चित केला जाऊ शकतो. या करारामुळं युरोपियन युनियनमधून आयात केल्या जाणाऱ्या कारवरील आयात शुल्क 66-110 टक्क्यांवरुन कमी होऊन 30 ते 35 टक्के राहील. येत्या पाच वर्षात आयात शुल्क 10 टक्क्यांवर येईल.
ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅक्सच्या नोटनुसार भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारामुळं प्रीमिअम एक्झ्युकेटिव्ह आणि अलिशान कार क्षेत्रातील ब्रँडवर परिणाम होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्या कारची किंमत 23 लाखांपेक्षा अधिक आहे, त्यावर परिणाम होईल. महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यावर देखील परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा XUV700 आणि स्कॉर्पिओ यासारख्या मॉडेल्समुळं महिंद्रा अँड महिंद्रा या सेगमेंटमध्ये महत्त्वाची कंपनी आहे.
दरम्यान भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करार पुढील वर्षी म्हणजे 2027 पासून लागू होणार आहे. कारण अद्याप काही कायदेशीर बाबी प्रलंबित आहेत.
महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर गेल्या वर्षी 7 एप्रिल 2025 ला 2360.45 रुपयांवर होता. तेव्हापासून शेअरमध्ये 62.68 टक्क्यांची तेजी आली होती. 5 जानेवारीला महिंद्राच्या शेअरनं 3840.00 रुपयांचा उच्चांक गाठला होता. सध्या त्या तुलनेत शेअरमध्ये 400 रुपयांची घसरण झाली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.