जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरव
Abhijeet Dipke big Allegation on Modi Government: काल काँक्रोच जनता पार्टीने दिल्लीत मोठ्या मार्चचे नियोजन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सरकारने अत्यंत क्रूरपणे जमलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. धुरांच्या नळकांड्या टाकल्या, 12-14 वर्षांच्या मुलींवर काठीने हल्ला केला. अत्यंत अमानुषपणे लाठीचार्ज केला असल्याचा आरोप अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी केला. आज सकाळी त्यांनी जंतर मंतरवरती माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी बोलताना सरकारवर गंभीर आरोप केले. हे सरकार आपल्याच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत असल्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. तर यावेळी सरकारच्या हेतूवरही दिपके (Abhijeet Dipke) यांनी संशय व्यक्त केला.
लहान मुलं आहेत. शाळा कॉलेजातील मुलं आहेत. १७-१८ वर्षाची आहेत. एक महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत. काही झालं नाही. काल दिल्ली पोलिसांमुळे हल्ला झाला. त्यांनी काठीने हल्ला केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. एका मुलीला जबर मारलं. या मुलीला काही झालं तर त्याला मोदी आणि प्रधान जबाबदार असेल. १५० मुलं जखमी झाले आहेत. मी रुग्णालयात जाऊन पाहिलं. मोदींच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी हल्ला केला, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.(Abhijeet Dipke)
सरकारने आम्हाला बोलावून घेतलं आणि चर्चा करु, मागण्या काय ऐकून घेतलं. आशुतोष रांका आणि सौरभ दासला बोलावून घेतलं, जे, पी, नड्डा यांच्या घरी मोबाईल काढून घेतले. हाऊस अरेस्ट केलं, एकप्रकारे तिथून निघून दिलं नाही. मला इथे एकटं पाडण्याचा प्लॅन आखला, फूट पाडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरुन अफारतफरी माजावी, त्यांना पाच तास बसवून ठेवलं, नेम टॅग हटवण्यास सांगितले होते, आता सरकारला चर्चा करायची असेल तर जंतरमंतरला यावं लागेल, आम्ही जाणार नाही, अशी भूमिका देखील दिपके यांनी मांडली आहे.
सौरव आणि आशुतोष ग्राऊंडवर नाहीत असं नरेटिव्ह सेट करण्याचं प्रयत्न केला. मला इकडे एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला जे पी नड्डांच्या घरी हाऊस अरेस्ट केलं, मोबाईल काढून घेण्यात आले, मोबाईल नव्हते, गीतांजली मॅडमवर हल्ला केला, लाठीहल्ला संदीप लांबा या पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे केस खेचले, मलाही लाठीमाराचा प्रयत्न, सरकार असेच चिरडले आहेत, केंद्र सरकारला शरम वाटली पाहिजे. हे सरकार नाही हुकूमशाहा आहेत. जनतेने निवडलेले सरकार त्यांच्यासाठी काम करते, असंही त्यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, काल लाठ्या खाल्या डोकी फोडून घेतली हात पाय तुटले, त्यानंतरही आज पुन्हा तुम्ही त्रास देत आहात, एन्ट्री पॉईंट बंद का? करुन ठेवलेत, तुमचं मन भरलं नाही का? तुम्ही रक्त वाहिलंय तरुणांचं, लहान मुलींना मारलंय असंही अभिजीत दिपके यांनी सरकारला उद्देशून म्हटलं आहे.
Abhijeet Dipke : वांगचुक यांचे उपोषण सुरूच राहणार
दगडांचे ट्रक कुठून आले. आमच्या प्रत्येकाच्या बॅगा चेक केल्या जात आहे. बॅरिकेड्स लावले आहेत. पक्षीही आत शिरू शकत नाही. मग ट्रक कुठून आले. पोलिसांनी प्लान केला आहे. काल सिव्हिल ड्रेसमध्ये लोक आले. त्यांच्या हातात पोलिसांनी दांडके दिले. नेम प्लेट हटवून मारहाण केली. काल वांगचुक उपोषण सोडणार होते. आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं होतं. त्यांची देशाला गरज आहे हे सांगितलं. त्यांनी ऐकलं. पण काल मुलांना ज्या पद्धतीने मारहाण झाली. त्यामुळे वागंचुक यांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अभिजीत दिपके यांनी केली आहे.
वांगचुक यांच्याशी माझी चर्चा झाली. डॉक्टर आणि वांगचुक यांच्या पत्नीशीही बोललो. वांगचुक यांचं शरीर केवळ २०-२५ दिवसच उपोषण सुरू करू शकतं. तीन चार दिवसाने त्यांचे अवयव डॅमेज होऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यांना परत उपोषण सुरू करावं लागलं हे दुर्देव आहे. पोलिसांनी ज्या क्रूरपणे मारहाण केली हे पाहून त्यांनी उपोषण सुरू केलं, असे दिपके म्हणाले.
Abhijeet Dipke : बोलावून मोबाईल जप्त केले, मला एकटं पाडलं गेलं
आमचं धरणं आंदोलन सुरू राहील. आमच्या सोबत सरकारने टाइम वेस्ट केला. मागण्यांच्या चर्चेसाठी बोलावलं. बोलावून मोबाईल जप्त केले.मला एकटं पाडलं गेलं. त्यामुळे गोंधळ उडेल हा त्यांचा प्लान होता. आमचे सदस्य एकत्र राहू नये हा त्यांचा डाव होता, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. पाच तास नड्डा यांच्या घरी बसवून ठेवलं. नेम टॅग हटवून मुलांवर हल्ला केला. आता आम्ही चर्चेला जाणार नाही. त्यांना आमच्याकडे चर्चेला यावं लागेल, असे दिपके यांनी जाहीर केले आहे.
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Comments are closed.