दिल्लीतील प्रदूषणामागे 'आप'चे मोठे षड्यंत्र

कपिल मिश्रा यांचा गंभीर आरोप : आम आदमी पक्षावर भाजप नेत्याचा निशाणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणावरून राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीचे मंत्री आणि भाजप नेते कपिल मिश्रा यांनी प्रदूषणाच्या मुद्यावरून आम आदमी पक्षावर (आप) गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील प्रदूषण वाढवण्यासाठी ‘आप’ने मोठे षड्यंत्र रचल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंजाबमधील शेतांमध्ये जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्यामुळे दिल्लीतील प्रदूषण वाढल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला.

दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावत असताना कपिल मिश्रा यांनी ‘आप’च्या पंजाबमधील सरकारला लक्ष्य केले. त्यांच्या मते, पंजाबमधील शेतांमध्ये जाळण्यात येणाऱ्या पीक अवशेषांमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो आणि त्याचा परिणाम दिल्लीच्या हवेवर होतो. या परिस्थितीला आम आदमी पक्षाचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

कपिल मिश्रा यांनी पंजाबमधील शेतांमध्ये आग लावण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. दिल्लीतील प्रदूषणाच्या प्रŽावरून भाजप आणि ‘आप’ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच त्यांनी हा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर कपिल मिश्रा यांच्या आरोपांमुळे दिल्ली आणि पंजाबमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. ‘आप’कडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Comments are closed.