वनडे सामने 40 षटकांचे होणार का? आयसीसीच्या वार्षिक बैठकीतील 4 मोठे निर्णय समोर!
एडिनबर्गमध्ये 4 दिवस चाललेल्या आयसीसीच्या (Indian cricket Council) वार्षिक बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यात वनडे फॉरमॅट आणि वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपमधील बदलांचा समावेश होता, पण काही बाबतीत एकमत होऊ शकले नाही. दरम्यान, मॉरिशसला आयसीसीचे सहयोगी सदस्यत्व (Associate Membership) मिळाले आहे.
वनडे फॉरमॅट 50 षटकांचाच राहणार: वनडे क्रिकेटमधील (Odi cricket) षटकांची संख्या 50 वरून 40 करण्याचा विचार केला जात होता. 1987 च्या विश्वचषकापूर्वी वनडे सामने 60 षटकांचे असायचे, त्यानंतर 39 वर्षांनी पुन्हा एकदा त्यात बदल करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, सध्यातरी वनडे सामने 50 षटकांचेच खेळवले जाणार आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये बदल नाही: सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 9 संघ सहभागी होतात. अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंडला यात समाविष्ट करण्याबाबत चर्चा होती, ज्यामुळे संघांची संख्या 12 होईल अशी अपेक्षा होती. मात्र, यावर सकारात्मक निर्णय झाला नाही आणि सध्यातरी 9 संघच (भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि इंग्लंड) कायम राहतील.
अमेरिका आणि कॅनडा क्रिकेट बोर्डावरील निलंबन कायम: युएसए (USA) क्रिकेट बोर्डाला सप्टेंबर 2025 मध्ये निलंबित करण्यात आले होते. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 पूर्वी हे निलंबन हटवणे महत्त्वाचे मानले जात असले तरी, सध्या ते कायम ठेवण्यात आले आहे. तसेच, जून महिन्यात निलंबित करण्यात आलेल्या कॅनडा क्रिकेट बोर्डाचे निलंबनही आता तरी हटवण्यात आलेले नाही.
मॉरिशसला आयसीसीचे सदस्यत्व: मॉरिशसला आयसीसीचे सदस्यत्व मिळाले असून, हा देश आयसीसीचा सदस्य होणारा जगातील 111 वा देश ठरला आहे. हे जागतिक स्तरावर क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे. मॉरिशस सध्या ‘एसोसिएट मेंबर’ (सहयोगी सदस्य) म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.