CJP च्या संघात मोठे फेरबदल

2 नव्या प्रवक्त्यांची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) स्वत:च्या संघटनेला विस्तार देत अनेक पदांवर नव्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाने सह-संयोजक करण्यात आलेल्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या जागी दोन नव्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची घोषणा केलीआ हे. सीजेपीकडून 6 नव्या संघटन महासचिवांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली आहेत. या महत्त्वाच्या पदावर रेखा शर्मा, अक्षय शिंदे, प्रेम आकाश, अनाम उज्जमा, बालाकृष्ण शुक्ला यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

सीजेपीने सुधीर सांगवान आणि सिद्धांत भारद्वाज यांना राष्ट्रीय प्रवक्ते करण्यात आले आहे. यापूर्वी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याकडे ही जबाबदारी होती. दोघांनाही राष्ट्रीय सह-संयोजक करण्यात आल्यापासून हे पद रिक्त होते. सीजेपीच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम तीन प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली होती. तिसरा प्रवक्ता विजेता दहियाला 20 जुलै रोजी झालेल्या बर्गर वादानंतर पदावरून हाकलण्यात आले होते.

नव्या निदर्शनांपूर्वी विस्तार

कॉकरोच जनता पार्टीने उत्तर विभागासाठी समन्वय समितीत अनेक सदस्यांना समाविष्ट केले आहे. सीजेपीने स्वत:च्या संघटनेचा विस्तार हा दिल्लीत नव्या निदर्शनांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर केला आहे. सीजेपीने 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत इंडिया गेटपासून पोलीस मुख्यालयापर्यंत निदर्शन मोर्चाची घोषणा केली आहे. पक्षाने केंद्र सरकारवर आश्वासनांची पूर्तता न करण्याचा आरोप केला आहे. विद्यार्थी आणि निदर्शकांच्या विरोधात नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घेणे किंवा रद्द करण्याचे आश्वासन यात सामील आहे. तसेच नीट परीक्षेशी निगडित प्रकरणांमध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना भरपाई देण्याची मागणी सीजेपीकडून सरकारकडे करण्यात आली होती.

यापूर्वीही महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या

यापूर्वी 6 ऑगस्ट रोजी सीजेपीने स्वत:च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना केली, ज्यात संस्थापक अभिजीत दीपके यांना राष्ट्रीय संयोजक नियुक्त करण्यात आले. तर सौरव दास आणि आशुतोष रांका यांना संघटनेचे सह-संयोजक करण्यात आले होते. सीजेपीने अजिंक्य शिंदे यांना राष्ट्रीय संघटन प्रभारी, दीपक बालियान यांना संघटन सह-प्रभारी नियुक्त केले होते. तर आफरीन नवाज यांना राष्ट्रीय सचिव, विजय रे•ाr मल्लांगींना माध्यम प्रमुख, रत्ना सिंह यांना कायदेशीर प्रकरणांच्या प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

Comments are closed.