वडेट्टीवारांना मोठा धक्का, धानोरा नगरपंचायतीच्या ,नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचे भाजपमध्ये प्रवेश
गडचिरोली: गडचिरोलीच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठी राजकीय खेळी केली आहे. धानोरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह तब्बल 9 नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढली
धानोरा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे 13 नगरसेवक असून उपनगराध्यक्ष ललित बरछा यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम यांच्यासह नगरसेवक भूषण उंदीरवाडे, माणिक मडावी, कालिदास मोहुर्ले, नरेश चिमूरकर ,सुषमा भुरसे, सीमा काटेंगे, यामिना पेंदाम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडे फक्त चार नगरसेवक उरले असून या प्रवेशामुळे धानोरा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही मोठी राजकीय ताकद वाढल्याचं मानलं जात असून, काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
धानोरा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या
धानोरा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17 पैकी 13 जागा जिंकत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते. गडचिरोली जिल्ह्यातील या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने मोठे यश मिळवले होते. मात्र, 13 पैकी काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये नगराध्यक्षांचा देखील समावेश आहे. त्यामुळं हा विजय वडेट्टीवारांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण ज्या नगरपंचायतीच्या विजय वडेट्टीवार यांनी एकहाती सत्ता आणली होती. आज त्याच नगरपंचायतीच्या 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित वडेट्टीवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं धानोरा नगरसपंचायतीवर आता भाजपचं वर्चस्व निर्माण झालं आहे.
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Comments are closed.