जबर धक्का, ट्रम्प हरले! अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि रिप्रेझेंटेटिव्हज्वर डेमोक्रॅट्सचे वर्चस्व
बेफाम व मनमानी निर्णय घेऊन जगभरात आर्थिक व राजकीय गोंधळ उडवून देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आज जबर धक्का बसला. अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांचा सपशेल पराभव झाला. अमेरिकी संसदेच्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् या दोन्ही सभागृहांवर विरोधी बाकांवरील डेमोक्रॅटिक पक्षाने वर्चस्व मिळवले आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष अल्पमतात गेला असून यामुळे पुढील दोन वर्षे ट्रम्प यांना आपला अजेंडा रेटणे अशक्य होणार आहे.
मध्यावधी निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या (प्रतिनिधी सभागृह) सर्व ४३५ आणि सिनेटच्या १०० पैकी ३५ जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी प्रतिनिधी सभागृहामध्ये डेमोक्रॅट पक्षाने २२४ जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला. ट्रम्प यांच्या पक्षाला १३५ जागांपर्यंत मजल मारता आली. तर, या निवडणुकीनंतर १०० सदस्यांच्या सिनेटमध्ये डेमोक्रॅट पक्षाचे संख्याबळ ५४ जागांवर पोहोचले.
मध्यावधी कशासाठी?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांचा अर्धा कार्यकाळ संपल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होतात. त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होत नाही. मात्र, ही निवडणूक राष्ट्राध्यक्षांच्या दोन वर्षांच्या कामकाजाबद्दल जनतेचा कौल मानला जातो. कनिष्ठ सभागृहातील सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक होते, तर वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमधील एकतृतीयांश जागांसाठी निवडणूक होते.
महागाई आणि युद्धखोरीचा फटका
महागाई, इराण विरुद्धचे युद्ध आणि ट्रम्प यांच्या घटलेल्या लोकप्रियतेने डेमोक्रॅट पक्षाला हात दिला. रिपब्लिकनचा गड असलेल्या टेक्सास, साऊथ कॅरोलिना, कन्सास येथेही डेमोक्रॅटिक पक्ष जिंकला. प्रतिनिधी सभागृहातील डेमॉक्रॅट्सच्या जागांमध्ये ४० जागांची भर पडली आहे. ही २० वर्षांतील उत्तम कामगिरी आहे.
मला थोडा धक्का बसला. मला वाटलं होतं रिपब्लिकन्स सरस ठरतील, पण डेमोक्रॅट्सनी चांगली कामगिरी केली. त्यांनी चांगली फाइट दिली. हा कौल मी स्वीकारतो. डेमोक्रॅट्सच्या सहकार्यानं काम करू.
Comments are closed.