न्यायालयाच्या आदेशानंतरही दिया मिर्झाचा व्हिडीओ गायबच! पालिकेची टाळाटाळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

न्यायालयाने निर्देश देऊनही अभिनेत्री दिया मिर्झा यांचा प्रदूषणविरोधी जनजागृतीचा व्हिडीओ मुंबई महापालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर पुन्हा झळकलेला नाही. व्हिडीओ रिपोस्ट करण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दिया मिर्झा यांचा व्हिडीओ भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून हटविण्यात आला होता. या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत व्हिडीओ पुन्हा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले. मात्र, त्यानंतरही व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला नाही.

म्हणे, अभ्यास सुरू आहे!

स्थायी समितीत या प्रकरणावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाली असून तिचा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

Comments are closed.