‘बोध कीर्तन’ ॲमेझॉनच्या बेस्टसेलर यादीत, संजय राऊत यांच्या पुस्तकाला वाचकांची मोठी पसंती
शिवसेना नेते, खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाने प्रकाशनानंतर अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेले हे पुस्तक ॲमेझॉनच्या ‘बायोग्राफीज अँड ऑटोबायोग्राफीज’च्या बेस्टसेलर यादीत थेट सहाव्या क्रमांकावर झळकले आहे.
या यशाबद्दल संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. ॲमेझॉनच्या बेस्टसेलर यादीत सोनिया गांधी, शहीद भगतसिंग आणि व्हिक्टर फ्रँकल यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या पुस्तकांसोबत ‘बोध कीर्तन’ला स्थान मिळणे, हे केवळ वाचकांच्या प्रेमाचे फळ असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राऊत म्हणाले आहेत की, “ॲमेझॉनच्या बायोग्राफीज अँड ऑटोबायोग्राफीज बेस्टसेलर यादीत बोध कीर्तनला 6 स्थान मिळाले आहे. सोनिया गांधी, भगतसिंग, व्हिक्टर फ्रँकल यांच्या पुस्तकांसोबत यादीत दिसणे हे वाचकांच्या प्रेमाचे फळ आहे. धन्यवाद! ज्यांनी वाचले, ज्यांनी शेअर केले, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
Comments are closed.