Chandrapur News – भद्रावती शहरात काळजाचा ठोका चुकविणारी घटना, भरधाव दुचाकीची 8 वर्षीय बालकाला धडक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील नागसेन नगर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीने आठ वर्षीय सायकलस्वार बालकाला जोरदार धडक दिली. सुदैवाने अपघातातून बालक थोडक्यात बचावले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अल्पवयीन चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिकवणी संपल्यावर रस्ता ओलांडून घरी जाणाऱ्या प्रियांशु देसाई (8) या सायकलस्वार बालकाला भरधाव दुचाकीने धडक दिली. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नागरिकांनी अल्पवयीन चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments are closed.