अवैध बांगलादेशी प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई, मालेगावात तब्बल 9 ठिकाणी छापेमारी

मालेगाव एड रेड: ईडीकडून (ED) मालेगावमध्ये मोठे सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. मालेगावात ईडीकडून तब्बल 9 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. बोगस जन्म दाखला प्रकरणात अटक असलेले तव्वाब शेख यांच्या राहत्या घरी ईडीने छापा टाकला आहे. यामुळे मालेगावात एकच खळबळ उडाली आहे.

मालेगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेले तव्वाब शेख हे बोगस जन्म दाखला प्रकरणात अटकेत आहे. आता ED ने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून झाडाझडती सुरू केली आहे. तर ED कडून मालेगाव शहरात एकूण ९ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या 16 वेगवेगळ्या एफआयआरच्या अनुषंगाने ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अवैध बांगलादेशी प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई

ED ने या प्रकरणी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अवैध बांगलादेशी नागरिकांशी थेट संबंध असल्याचे तपासात समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर झाली होती. त्यांनी मालेगावातील बनावट दस्तावेजांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतरच पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला होता, ज्यामुळे आता ED कडून सखोल चौकशी होत आहे. आता मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. आता या छापेमारीत नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा : किरीट सोमय्या

दरम्यान, मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा (Birth Certificate Scam) झाल्याचा दावा करीत, मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे अनेकदा मालेगाव दौऱ्यावर आले होते.   यानंतर शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. कामकाजात पुरेसे गांभीर्य न दर्शविता जन्मदाखले निर्गमित करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे व विद्यमान नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आले होते.

आणखी वाचा

Kirit Somaiya : मालेगावात चार हजार बांगलादेशींना बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; तिघांवर गुन्हा दाखल

अधिक पाहा..

Comments are closed.