माजी आमदार निहाल अहमद यांची कन्या, टिपू सुलतानचा फोटो लावून राज्याचं लक्ष वेधलं; कोण आहेत शान-ए
कोण आहेत मालेगावचे उपमहापौर शान ई हिंद निहाल अहमद: मालेगाव महानगरपालिकेत (Malegaon Municipal Corporation) नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच शहरातील राजकारण तापले आहे. मालेगाव महापालिकेत समाजवादी पार्टीच्या उपमहापौर शान ए हिंद (Malegaon Deputy Mayor Shan E Hind) यांनी टिपू सुलतानचा फोटो त्यांच्या दालनात लावला. यानंतर राज्यात वाद निर्माण झाला आहे. उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात लावलेल्या टिपू सुलतानच्या छायाचित्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले. अनेकांनी या कृतीवर तीव्र टीका करत उपमहापौरांवर निशाणा साधला. शान ए हिंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच टिपू सुलतान यांच्या फोटोवरून नव्या वादाला तोंड फुटले आणि संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात लक्ष वेधून घेतले. पण शान-ए-हिंद नेमक्या कोण आहेत?, जाणून घ्या…
कोण आहेत शान-ए-हिंद? (Who Is Malegaon Deputy Mayor Shan E Hind Nihal Ahmed)
– मालेगाव महापालिकेत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत..
– शान-ए-हिंद या मालेगावच्या विद्यमान उपमहापौर आहेत.
– जनता दलाचे दिवंगत नेते व मालेगावचे सात वेळचे आमदार निहाल अहमद यांच्या त्या कन्या आहेत.
– निहाल अहमद यांनी अनेक दशके मालेगावच्या राजकारणावर आपली पकड ठेवली होती.
– 2002 मध्ये मालेगाव महानगरपालिका झाल्यानंतर निहाल अहमद हे पहिले महापौर होते.
– मालेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, महापौर, सात वेळा आमदार अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांनी गाजवली. एस. एम. जोशी यांचे मानसपुत्र म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.
– त्याआधी शान-ए-हिंद यांच्या मातोश्री सजेदा निहाल अहमद यांनी नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते.
– शान ए हिंद यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.
– शान-ए-हिंद यांना त्यांचे बंधू बुलंद इक्बाल यांच्याबरोबर कुटुंबाचा राजकीय वारसा चालवण्यासाठी तयार करण्यात आले..
– मात्र, वडील आणि भावाच्या अकाली निधनानंतर त्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या.
– त्यांनी मालेगावच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
– 2023 मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने भाजपाशी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शान-ए-हिंद यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला.
– 2024 मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
– महापालिका निवडणुकीपूर्वी शान-ए-हिंद यांच्या पतीने अनेक वर्षांचे वैर बाजूला सारून माजी आमदार शेख आसिफ यांच्या ‘इस्लाम’ पक्षाशी हातमिळवणी केली.
– मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार मुफ्ती इस्माईल यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी इस्लाम पक्षाबरोबर आघाडी केली.
– महापालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी व इस्लाम पक्षाच्या आघाडीने एकूण 40 जागांवर विजय मिळवला.
– शान-ए-हिंद यांच्यासह त्यांचे पती मुश्तकिम डिग्निटी या दोघांसह समाजवादीचे पाच नगरसेवक निवडून आले.
– शान ए हिंद यांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला.
– मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच टिपू सुलतान यांच्या फोटोवरून नव्या वादाला तोंड फुटले आणि संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात लक्ष वेधून घेतले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.