मालिकेच्या विजेत्यांचे फक्त कम्युनिटीज; 11 वाजता अटल येथे 11 वाजता; अजितदादचा पीए, भाग्ने
बारामती (पुणे): माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत (Baramati News) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘सहकार बचाव पॅनल’ने PDCC बँकेवर गंभीर आरोप केले असून, रात्री 11 वाजेपर्यंत ही बँक उघडी ठेवण्यात आली होती, असा दावा करत तेथे मतदार यादी आढळल्याचा खुलासा केला आहे. रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार बचाव पॅनल’चे कार्यकर्ते बँकेत पोहोचले आणि त्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा केला आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पीए सुनील मुसळे बँकेत उपस्थित होते, तसेच मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे होते, असा दावा तावरे यांनी केला. यामुळे आता बारामतीतील राजकीय वातावरण तापलं आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना तावरे म्हणाले, सुनील मुसळे रात्री 11 वाजता बँकेत काय करत होते? येथे सदस्यांची, त्यांच्या नातेवाईकांची आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्यांची यादी सापडली. इरिगेशनचे अधिकारी डुबल यांचे नावही यामध्ये आहे. त्यांनी पाणी वाटप संस्थांवर दबाव टाकून मदत करण्यास भाग पाडल्याचा आरोपही तावरे यांनी केल आहे. तावरे यांनी अजित पवार यांच्यावर शासकीय यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप केला आहे.
बँकेचे स्पष्टीकरण
या आरोपांवर PDCC बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “बँक साडेपाच वाजता बंद होते. नंतर फोन आल्यामुळे मी पुन्हा बँकेत आलो. संगणकीय काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी उशिरा थांबले होते. मात्र, माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या बँकेत कशा आल्या हे मला माहीत नाही.”
नेमकं काय प्रकरण?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे. याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला आहे. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक का उघडी ठेवण्यात आली होती याबाबत सहकार बचाव पॅनलचे कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करत आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला जात आहे. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीस दाखल झाले होते. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबतचा जाब या ठिकाणी विचारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी त्याठिकाणी होते, असा दावा रंजन तावरेंनी केला आहे. पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे.
युगेंद्र पवारांचा संताप
बँकेची वेळ ही पाच वाजेपर्यंत असते इतक्या वेळ ही बँक उघडी होती. त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या होत्या, त्या का होत्या. सहकारी संस्था शिक्षण संस्था याच्या देखील याद्या त्या ठिकाणी होत्या. बँकेचा लोड वाढला असावा त्यामुळे रात्री 11 पर्यंत हे बँक उघडी असावी अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिलेली आहे. अलीकडच्या काळात पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय, त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना अवघड झालं आहे. त्याचप्रमाणे हे राजकारण बदललं पाहिजे असे मत युगेंद्र पवारांनी व्यक्त केलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=DFSHDOXUM4
आणखी वाचा
Comments are closed.