मांस विक्रेत्यांसाठीचं ‘मल्हार प्रमाणपत्र’ काय आहे? ते कसे मिळते अन् कोणाला दिले जाते? जाणून घ्

मालाला प्रमाणपत्र: देशात विविध प्रकारच्या कामांसाठी तुम्हाला अनेक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. जे तुमच्या वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक आहेत. नुकतेच महाराष्ट्रात नवीन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मल्हार प्रमाणपत्र असे या प्रमाणपत्राचे नाव आहे. मंत्री आणि भाजप नेते नितीश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र लाॅन्च केले आहे. नितीश राणे यांनी तमाम हिंदूंना महाराष्ट्रात फक्त हिंदूंच्या दुकानातूनच मांस खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही.याची खात्री करण्यासाठी मल्हार प्रमाणपत्र सुरू करण्यात आले आहे. मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय आणि ते कोणाला दिले जाते?

मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय?

महाराष्ट्र सरकारचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितीश राणे यांनी 10 मार्च रोजी महाराष्ट्रात मल्हार प्रमाणन नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रातील झटका मांस दुकानांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील या सर्व मांस दुकानांची नोंदणी मल्हार प्रमाणपत्राद्वारे केली जाणार आहे. नोंदणी झाल्यानंतर या सर्व दुकानांना मल्हार प्रमाणपत्र दिले जाईल. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व मांसाची दुकाने हिंदू चालवतील. राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली आहे. या सर्व नोंदणीकृती मांस विक्रेत्यांना ‘मल्हार प्रमाणपत्र’ दिलं जाणार आहे.

मल्हार प्रमाणपत्रानुसार, महाराष्ट्रात मटण विकणारी दुकाने नोंदणीकृत असतील. या दुकानांचे प्रमाणपत्र फक्त हिंदूंना दिले जाईल. नितेश राणे यांनी लोकांना आवाहन केले आहे की, ज्या दुकानांमध्ये मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्या नोंदणीकृत दुकानातूनच मांस विकत घ्या. या मटण दुकानांमध्ये कोणतीही भेसळ होणार नाही आणि ती हिंदूंकडून चालवली जातील. सरकारच्या या मोहिमेद्वारे हिंदू तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मल्हार प्रमाणपत्र कोणाला देणार?

मल्हार प्रमाणपत्रासाठी मल्हार डॉट कॉम हे पोर्टल महाराष्ट्रातील झटका मांस दुकान मालकांसाठी सुरू करण्यात आले आहे.याअंतर्गत हिंदू मांस व्यापाऱ्यांना मल्हार प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी तुम्हाला MalharCertification.com या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. येथे हिंदू व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागेल. यानंतर मल्हार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

हलाल प्रमाणपत्राप्रमाणे काम करेल

वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, मल्हार प्रमाणपत्राद्वारे हिंदू समुदायांकडून पारंपरिक पद्धती वापरून मांस विकले जाणार आहे. एक प्रकारे, हे प्रमाणपत्र हलाल प्रमाणपत्राप्रमाणे काम करेल. हलाल सर्टिफिकेशनमध्ये मांस आणि इतर गोष्टी इस्लामिक कायद्यानुसार तयार केल्या जातात. त्याचप्रमाणे मल्हार प्रमाणपत्राद्वारे मांस तयार करून विकले जाणार आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी याबाबत वाद सुरू आहेत.

हिंदू आणि शीखांसाठी हलाल नसलेले मांस उपलब्ध करून देणे. तसेच हिंदू धार्मिक परंपरेनुसार बकरी आणि मेंढीचे ताजे, स्वच्छ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नसावे याची खात्री करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. या अंतर्गत विकले जाणारे हे मांस केवळ हिंदू खाटीक समुदायाच्या विक्रेत्यांकडून उपलब्ध केलेले असेल. मल्हार वेबसाइटनुसार, मांस तयार करताना काटेकोर हिंदू धार्मिक पद्धतींचे पालन करणाऱ्या विक्रेत्यांना प्रोत्साहन दिले जाते. जेणेकरून ते हिंदू खाटीक समुदायाच्या परंपरांचे पालन करेल. बहुतेक हिंदू असे मानतात की, मांस सेवनाची झटका पद्धत ही नैतिक पद्धत आहे. कारण प्राण्याला दीर्घकाळ त्रास न घेता त्वरित मारले जाते.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.