ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या मामा राजवाडेंना मोठा धक्का, फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी 15 तास कस


मामा राजवाडे नशिक गुन्हे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठी अ‍ॅक्शन घेतली आहे. नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे (Mama Rajwade Arrested) यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात (Gangapur Road Firing Case) त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, नाशिक गुन्हे शाखेकडून त्यांची तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आली आहे.

Mama Rajwade Nashik Crime: गोळीबार प्रकरणातील ‘मोठा मासा’ अखेर जाळ्यात

सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मामा राजवाडे यांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुनील बागुल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागुल (Ajay Bagul) याला यापूर्वीच अटक झाली आहे, तर अन्य आरोपी फरार आहेत. जुन्या वादातून दोघांवर गोळीबार करत गंभीर मारहाण करण्यात आल्याचे या प्रकरणात नमूद आहे.

Mama Rajwade Nashik Crime: भाजपमध्ये प्रवेश झाला पण अडचणी वाढल्या

मामा राजवाडे हे ठाकरे गटात नाशिक शहराचे महानगरप्रमुख होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा भाजपप्रवेश म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी झाकण्यासाठी उठवलेलं पाऊल असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. राजवाडे हे सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वीच राजवाडेंना पोलिसांनी गुन्हे शाखेत बोलावून 15 तास तपासणीसाठी बसवले होते. रात्री उशिरापर्यंतही त्यांना घरी सोडण्यात आले नव्हते. आता मामा राजवाडेंवर अटकेची कारवाई केली जात आहे.

Mama Rajwade Nashik Crime: नाशिकच्या राजकारणात खळबळ

उत्तर महाराष्ट्रातील विरोधकांना निवडणुकीत आव्हान देण्यासाठी भाजपने मागील काही महिन्यांपासून पक्षात ‘इनकमिंग’ मोहिम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक वादग्रस्त नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. मात्र, आता याच नेत्यांवर पोलिसांची नजर वळली असून, राजकीय प्रतिष्ठा धोक्यात येण्याची चिन्हं भाजपसमोर उभी राहिली आहेत. मामा राजवाडेंच्या अटकेने नाशिकच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा पक्षप्रवेश योग्य की अयोग्य? या चर्चेला नाशिकमध्ये पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; Video

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal on Nashik Crime: 9 महिन्यात 44 खून अन्…, फडणवीसांनी कायदा-सुव्यस्थेला हरताळ फासला, महाजन पिस्तुल्या; नाशिकच्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळांनी सगळंच काढलं

Nashik Crime News: मोठी बातमी: सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, प्रकाश लोंढेंना अटक; नाशिक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.