ममता बॅनर्जी यांची तृणमूलच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी.
अभिषेक बॅनर्जी निलंबित : टीएमसीच्या बंडखोर गटाचा निर्णय
वृत्तसंस्था/ कोलकाता
टीएमसीमधील बंडखोर गटाने सोमवारी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना त्यांच्या पदांवरून निलंबित केल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली. न्यूटाऊन येथे सायंकाळी झालेल्या बैठकीत बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी हावडा सेंट्रलचे आमदार अरूप रॉय यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. इतकेच नाही, तर या गटाने अभिषेक बॅनर्जी यांना अखिल भारतीय महासचिव पदावरूनही निलंबित केले. तसेच बंडखोर गटाची नजर आता टीएमसीच्या बँक खात्यांवर आहे. लवकरच कायदेशीर कारवाईची घोषणा करण्यात येणार आहे.
बंडखोर टीएमसी आमदारांनी सोमवारी सकाळी न्यूटाऊन हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला 60 आमदार आणि 70 माजी नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत 30 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. बंद दाराआडच्या बैठकीत 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले. माजी मंत्री आणि आमदार अरुप रॉय यांची नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेचतर संदीपान साहा, जावेद खान आणि ऋतब्रता बॅनर्जी यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फिरहाद हकीम, अरुप बिस्वास आणि रथिन घोष यांची उपाध्यक्षपदा नेमणूक करण्यात आली आहे.
Comments are closed.