वडिलांच्या मृत्यूबाबत विरोधात निकाल; लगेच एकनाथ शिंदेंनी ओमराजेंना फोन फिरवला, एकच शब्द दिला!

मराठी On Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगर (Opration Tiger) यशस्वी झाल्याची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत काल (22 जून) अधिकृत प्रवेश झाला. आम्ही जे करतो ते फुलप्रुफ करतो. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी केली. शिंदेंच्या शिवसेनेनं मोठं शक्तिप्रदर्शन करत ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर (मराठी On Omraje Nimbalkar) यांचं कौतुक केलं.

ओमराजे आपल्या मनाचे राजे आहेत. काल-परवा त्यांनी कार्यकर्त्यांनी चर्चा केली. मतदारसंघात विकास झाला पाहिजे, कामं झाली पाहिजे हे सर्व ऐकून घेतलं. हे स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले नाहीत. मतदारसंघाला न्याय देण्यासाठी आले आहेत. ओमराजे त्यांच्या वडिलांची केस होती, त्या केसचा दुर्दैवी आणि अनपेक्षित निकाल लागला. निकाल लागल्यानंतर त्याच दिवशी मी त्यांना फोन केला आणि सांगितलं हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. शिवसेना खंभीरपणे तुमच्यासोबत आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. (मराठी On Omraje Nimbalkar)

6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील आणि निवडूनही येतील- एकनाथ शिंदे (मराठी Opration Tiger)

विशेष म्हणजे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील आणि निवडूनही येतील अशी घोषणाही यावेळी एकनाथ शिंदेंनी केली. 2024 मध्ये ईशान्य मुंबई आणि धाराशिव हे 2 मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आले होते. मात्र शिंदेंच्या घोषणेनंतर हे दोन्ही मतदारसंघ भाजपनं शिवसेनेला सोडलेत का? असा प्रश्न समोर येत आहे.

मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला- ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar Opration Tiger)

माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ. मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला, तुमच्या प्रश्नांसाठी लढला आणि पुढेही लढत राहील. पक्ष बदलला असला तरी जनसेवेचे ध्येय, विकासाची तळमळ आणि तुमच्यावरील प्रेम यात कोणताही बदल होणार नाही. तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझी खरी ताकद आहे. विकास, प्रगती आणि जनसेवा या एकाच ध्येयाने मी पुढील वाटचाल करणार आहे, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता- (Pawanraje Nimbalkar Case)

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात 20 जून रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने अंतिम निकाल दिला. पुराव्याअभावी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालावर ओमराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातमी:

मराठी : संजय दिना पाटील बेधडक, ओमराजे मनाचे राजे ते नागेश पाटील आष्टीकर ओपनिंग बॅटसमन, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना शिंदेंकडून खास विशेषणं

Comments are closed.