मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या ‘या’ गाण्याची फर्माइश,

नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व नेते एकत्रित जमले आहेत. नागपुरात गेल्या वर्षीप्रमाणे आमदार, मंगलप्रभात लोढांनी (Mangal Prabhat Lodha) हुर्डा पार्टीचे (Hurda party) आयोजन केले होते, यावेळी भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) हुर्डी पार्टी गाजवली. यावेळी त्यांनी गाणी गायली. हुरडा पार्टीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गाणं गायलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यांनी त्यांना मनमुराद दाद दिली. मंत्री मंगलप्रभात लोढांनी ही हुरडा पार्टी आयोजित केली होती. “एक दिन मिट जायेगा माती के मोल” हे गीत त्यांनी यावेळी स्टोजवर गायलं. विधानसभा अध्यक्षांच्या गाण्यावर उपस्थित आमदारांनी, नेत्यांनी आणि मंत्र्यांनी देखील उत्स्फूर्त दाद दिली आहे.

हुर्डा पार्टी आणि गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाण्याची फर्माईश केली. गायक कुमार सानू यांच्या गाण्याची फर्माईश देवेंद्र फडणवीस यांनी केली. आशिकी चित्रपटातील गाण्याला मुख्यमंत्र्यांनी पसंती दिली. मुख्यमंत्र्यांच्या फर्माईश नंतर सर्वच उपस्थितांनी त्यांच्या फर्माईशला दाद दिली. नाईंटींमधल्या गाण्याची मुख्यमंत्री फडणवीसांनाही भुरळ पडल्याचं दिसून आलं. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी “एक दिन मिट जायेगा माती के मोल” हे गीत गायलं, याला सर्व नेत्यांनी उत्स्फुर्त दाद दिली.

यावेळी झालेल्या या अनौपचारिक आणि रंगतदार कार्यक्रमामुळे अधिवेशनाच्या तणावपूर्ण वातावरणाला क्षणभर विराम मिळाला. विविध पक्षांतील आमदार, मंत्री आणि नेत्यांनी उपस्थित राहून एकोप्याचे दर्शन घडवले. हुरड्याच्या मैफिलीत सर्व गोष्टी, ताणतणाव  विसरून सर्वजण मनमोकळेपणाने सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. काही नेत्यांनीही स्टेजवर जाऊन नार्वेकर यांच्यासोबत गाण्याची साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. हिवाळी अधिवेशनाच्या धकाधकीत अशी हलकी-फुलकी मैफल रंगल्याने नेत्यांमधील जिव्हाळाही अधोरेखित झाला. मागील वर्षी देखील मंगलप्रभात लोढांनी असंच कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

आणखी वाचा

Comments are closed.