राष्ट्रवादीच्या आरोपींना अटक होऊ नये यासाठी तटकरेंचा पोलिसांवर दबाव, महेंद्र थोरवेंचा आरोप

मंगेश काळोखे खून प्रकरण : खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी 9 आरोपींना कोर्टाकडून 5 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या आरोपींना अटक न करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांचा  पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

जो पर्यंत मंगेश काळोखे यांच्या आरोपींना अटक होत नाही, तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे मत महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले. आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचे थोरवे म्हणाले. सर्व आरोपींना मकोका लावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहणार असल्याचे थोरवे म्हणाले.

26 डिसेंबर रोजी मंगेश काळोखे यांची झाली होती हत्या

रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या (Manesh Kalokhe murder case) करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडच्या खोपोलीमधील मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. या मागचा आका सुतारवाडीत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं होतं. यानंतर सुनील तटकरे हे थेट कर्जतमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचे आदेश तटकरेंकडून देण्यात आले आहेत.

शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

रायगडच्या खोपोली मधील मंगेश काळोखे यांच्या हत्याप्रकरणी राष्ट्रवादीवर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी गंभीर आरोप करत या मागचा आका सुतारवाडीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सुनील तटकरे यांनी कर्जतमध्ये आज पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. काळोखे यांच्या हत्याकांडाची आपण मुख्यमंत्री यांच्याकडे एसआयटी चौकशीची मागणी करणार आहोत, शिवाय या हत्येच्या घटनेचं सर्व सत्य बाहेर येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. कोणी या घटनेत काय काय केलं ते सुद्धा बाहेर येईल असा त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मी योग्य वेळी सगळं काही बोलेन असही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

खोपोली हत्याप्रकरणी महेंद्र थोरवेंचे गंभीर आरोप, आता सुनिल तटकरेंकडून SIT ची मागणी; गिरीश महाजनही स्पष्टच बोलले

आणखी वाचा

Comments are closed.